Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बॉलीवूडची मराठमोळी अभिनेत्री लग्नाच्या 12 वर्षानंतर प्रेग्नंट, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Radhika Apte Pregnant: बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेच्या घरी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. लग्नाच्या 12 वर्षांनंतर राधिका आई होणार आहे. तिने तिचे बेबी बंप दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. राधिकाचे हे फोटो पाहून चाहते तिचे सोशल मीडियावर अभिनंदन करत आहेत. राधिकाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

राधिका आपटे बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिस्टर मिडनाईट या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेली होती. जिथे तिने बेबी बंप दाखवत सर्वांना आश्चर्यचकित केले.यावेळी राधिकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.त्या ड्रेसमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.

Bollywood Actress Radhika Apte Pregnant

चाहत्यांकडून सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव

फोटो शेअर करताना राधिकाने लिहिले आहे की,सिस्टर मिडनाईट यूके प्रीमियर. तिने तिच्या पोस्टमध्ये प्रेग्नंट असल्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. फक्त चित्रपटाबद्दल लिहिले.राधिकाने तिचे काही सिंगल फोटो शेअर केले आहेत आणि काहींमध्ये ती रेड कार्पेटवर सेलिब्रिटी आणि क्रूसोबत पोज देताना दिसत आहे. राधिकाचे चाहते तिच्या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.

राधिकाच्या लूकबद्दल बोलायचे झालं तर तिने ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. राधिकाचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. राधिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झालं तर, तिने ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले आहे. दोघेही आपला वेळ मुंबई आणि लंडनमध्ये घालवतात. राधिकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर राधिका नुकतीच कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मेरी ख्रिसमसमध्ये कॅमिओमध्ये दिसली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+