'आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे', वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराचे पहिलं विधान
Malaika Arora Father Anil Mehta Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने वडील अनिल मेहता यांच्या दुःखद निधनानंतर पहिले विधान केलं केले आहे. वडिलांच्या निधनानंतर मलायकाने भावनिक पोस्ट करत कुटुंबासाठी प्रायव्हसी ठेवण्याचे आवाहन केले होते. आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, असेही तिने म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी घराच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सकाळी 9 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अनिल मेहता यांचे निधन मलायका आणि तिच्या कुटुंबासाठी खूप दुःख आणि कठीण काळ आहे. आता तिने तिच्या अधिकृत निवेदनात, म्हटलं आहे की "आम्हाला आमचे प्रिय वडील अनिल मेहता यांच्या निधनाची घोषणा करताना खूप दुःख होत आहे. ते एक चांगले व्यक्ती होते , एक एक चांगले आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे सर्वात चांगले मित्र होते."
मलायकाकडून चाहत्यांना आवाहन
अभिनेत्रीने मलायका पुढे लिहिले की, "आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांना प्रायव्हसी देण्याची विनंती करतो .आम्ही तुमच्या समजूतदारपणाची, समर्थनाची आणि आदराची प्रशंसा करतो."
अनिल मेहता यांच्या पार्थिवावर मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिसांनी प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे घोषित केले आहे.तर काही जणांनी ही आत्महत्या नसल्याचं म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी सांगितले की, मलायका अरोरा यांचे कुटुंब ज्या इमारतीत राहते, त्याच इमारतीत 62 वर्षीय अनिल मेहता आयशा मनोरमध्ये मृतावस्थेत आढळून आले. सहाव्या मजल्यावरील छतावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. सध्या तपास सुरू आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेलेली मलायका अरोरा ही बातमी समजताच तिच्या घरी पोहोचली.












Click it and Unblock the Notifications