मुलगी ईशाने वडील धर्मेंद्र यांच्या बद्दल केला मोठा खुलासा,म्हणाली वडील जुन्या विचारांचे
बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण तिची कारकीर्द विशेष काही यशस्वी ठरली नाही. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हेमा मालिनी यांची मुलगी असल्याच्या टॅगमुळे तिच्याकडे बरेच लक्ष वेधले जायचं, परंतु नंतर तिची कारकीर्द ठप्प झाली. पण ईशाने कधी ही म्हटलं नाही की बॉलिवूडमध्ये भरपूर काम केलं.
हेमा मालिनी यांची मुलगी असूनही ईशासाठी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवणे सोपे नव्हते. स्वत:ईशाने वडील धर्मेंद्र यांच्या बद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. ईशाने बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी वडील धर्मेंद यांचा विरोध होता, असं म्हटलं आहे.
वयाच्या 18 व्या वर्षी माझे लग्न व्हावे, वडीलांची होती इच्छा
वडिल धर्मेंद्र काहीसे पारंपारिक विचार होते आणि ईशाने चित्रपटात करिअर करण्याऐवजी लवकर लग्न करावे, अशी त्यांची इच्छा होती. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत ईशाने हा खुलासा केला आहे. वडिलांना मी चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते. ते एक पंजाबी वडील आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी माझे लग्न व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. ही त्याची शर्यत होती,ते अशा वातावरणात ते राहत होते की, जेथे स्त्रिया लवकर लग्न करतात.पण माझे संगोपन वेगळे होते.

वडिलांना कसं मनवलं?
ईशा अनेकदा तिच्या आईच्या यशस्वी कारकिर्दीची प्रशंसा करते आणि असेच यश मिळवण्याची आकांक्षा बाळगते. मात्र वडिलांची समजूत काढण्यासाठी वेळ आणि मेहनत घ्यावी लागली. तिने सांगितले की, मला माहित आहे की, मला काहीतरी बनायचे आहे, परंतु माझ्या वडिलांना मनवायला थोडा वेळ लागला. हे सोपे नव्हते, परंतु आता ही एक वेगळी गोष्ट आहे.
कठोर कुटुंबात वाढल्यामुळे ईशाच्या लाइफस्टाइलवर काहीसा परिणाम झाला. तिच्या आजीने तिच्या पेहराव आणि इतर अनेक गोष्टींवर अनेक बंधने लादली होती. ईशाने सांगितले की, माझी आजी खूप कडक होती. आम्हाला स्पॅगेटी टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घालण्याची परवानगी नव्हती. रात्री उशिरापर्यंत बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. कितीतरी वेळा खोटं बोलायचो आणि रात्री उशिरा बाहेर जायचो, असं ईशाने म्हटलं आहे.
जेव्हा ईशाने मार्ग बदलले
या वर्षी ईशाच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा बदल झाला. जेव्हा तिने लग्नाच्या 11 वर्षानंतर भरत तख्तानीपासून वेगळे होण्याची घोषणा केली. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या काही काळ गाजत होत्या, परंतु नंतर त्यांनी अधिकृतपणे पुष्टी करणारे विधान जारी केले, ज्याने अनेकांना आश्चर्य वाटले.












Click it and Unblock the Notifications