7 वर्षांनी लहान रणबीरसोबत प्रेमसंबंध होते का? अमिषा पटेलने पहिल्यांदा केलं भाष्य
Ameesha Patel News : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने अभिनेता रणबीर कपूरसोबतच्या कथित प्रेमसंबंधांबाबत मौन सोडले आहे. याबाबत अमीषाने फिल्मीमंत्राला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये गॉसिप सुरु होतं. परंतु, अमीषाने या सर्व अफवांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की, "आम्ही फक्त एकत्र पार्टी केली होती, माझे पालक आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर हे चांगले मित्र होते." रणबीरपेक्षा सात वर्षांनी मोठी असलेली अमीषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.

अमीषा पटेल आणि रणबीर कपूर यांच्यातील कथित प्रेमसंबंधाच्या अफवा 2017 मध्ये सुरू झाल्या. त्या काळात अमीषा रणबीरच्या कुटुंबाच्या जवळ दिसू लागली होती. विशेषतः, रणबीरचा चुलत भाऊ रोहित धवनच्या लग्नात गोव्यात ती उपस्थित होती, जिथे त्यांच्या जवळीकीच्या चर्चांना उधाण आले. त्याचबरोबर रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या खास पार्टीत अमीषा एकमेव बाहेरील व्यक्ती म्हणून उपस्थित होती, ज्यामुळे या अफवांना आणखी खतपाणी मिळाले. या पार्टीत अमीषाने रणबीरसह अनेक सेल्फी काढले, ज्यामुळे ती त्याच्याशी खूपच जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा झाली.
काही प्रसारमाध्यमांनी त्यावेळी म्हटले होते की, एका पार्टीदरम्यान अमीषाने रणबीरसोबत खासगीत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु रणबीरने तिला टाळले आणि पार्टीतून निघून गेला. सोशल मीडियावरही या जोडीच्या कथित नात्याबाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्या, ज्यामध्ये त्यांचे एकत्र फोटो आणि काही मंचांवर त्यांच्या कथित जवळीकीच्या चर्चा झाल्या. परंतु, रणबीर आणि अमीषा यांनी कधीच या अफवांवर अधिकृत भाष्य केले नव्हते.
अमीषा पटेलने या सर्व अफवांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, "रणबीर आणि मी कधीच डेट केले नाही. आम्ही फक्त एकत्र पार्टी केली होती. माझे पालक आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर हे चांगले मित्र होते. त्यामुळे आम्ही काही कौटुंबिक समारंभांमध्ये एकत्र आलो होतो." अमीषाने पुढे सांगितले की, त्या काळात ती रणबीरपेक्षा सात वर्षांनी मोठी होती आणि त्यांच्यातील मैत्री ही अजून मजबूत होत गेली.
अमीषाने हेही स्पष्ट केले की, तिच्या आणि रणबीरच्या कुटुंबातील जवळीकीमुळे अनेकदा चुकीचे अर्थ काढले गेले. तिने सांगितले की, "माझे आणि कपूर कुटुंबाचे संबंध खूप चांगले होते. मी त्यांच्या अनेक समारंभांमध्ये सहभागी झाले होते. पण त्याचा अर्थ असा नाही की, मी आणि रणबीर डेट करत होतो." असा खुलासा केल्याने त्या काळातील सर्व अफवा आणि गैरसमज दूर झाले आहेत.
अमीषाचे बॉलिवूड करिअर
अमीषा पटेलने 2000 मध्ये 'कहो ना... प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत दिसली. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर तिने 'गदर: एक प्रेम कथा', 'हमराज', 'भूल भुलैया' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. परंतु, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिच्या करिअरवर नकारात्मक परिणाम झाला. तिने एका मुलाखतीत सांगितले की, "माझ्या दोन सार्वजनिक नात्यांनी माझ्या करिअरवर खूप वाईट परिणाम केला. मी खूप प्रामाणिक आहे, आणि मला माझे मन मोकळेपणाने मांडायला आवडते. पण बॉलिवूडमध्ये प्रामाणिकपणा स्वीकारला जात नाही."
2008 नंतर अमीषाने जवळपास 12-13 वर्षे कोणतेही नाते ठेवले नाही आणि तिने आपले पूर्ण लक्ष करिअरवर केंद्रित केले. 2023 मध्ये 'गदर 2' चित्रपटात ती पुन्हा एकदा सकीना या भूमिकेत दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. परंतु, तिचे करिअर कधीच त्या उंचीवर पोहोचले नाही, जिथे तिची सुरुवात झाली होती. तिने सांगितले की, "माझ्या नात्यांमुळे माझे करिअर खूप वाईट परिणाम झाला आणि मला त्याची मोठी किंमत मोजावी लागली."












Click it and Unblock the Notifications