Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिषेकसोबत घटस्फोटाच्या अफवांना ऐश्वर्याने दिले असे उत्तर, घटस्फोट की अजून एकत्र ? पाहा व्हिडीओ

abhishek bachchan and aishwarya rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आजकाल ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्यासोबत इव्हेंटमध्ये दिसत आहे. दरम्यान ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यानंतर घटस्फोटाच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन मागील काही दिवसांपासून घटस्फोटाच्या अफवांमुळे सतत चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सातत्याने या जोडप्यामध्ये काहीही तरी बिनसलं असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण या अफवांना ऐश्वर्याने पुन्हा एकदा तिच्या लग्नाची अंगठी दाखवून ट्रोल्स करणा-याचं तोंड बंद केलं आहे.

abhishek bachchan and aishwarya rai

खरंतर पॅरिस फॅशन वीकमधील ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्याने काळ्या रंगाची पँट आणि एक लांब कोट परिधान केला होता. परंतु तिच्या पोशाखापेक्षा तिच्या लग्नाच्या अंगठीकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले. यासोबतच ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांना अखेर आता पूर्णविराम दिला आहे.

ऐश्वर्या रायचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऐश्वर्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये सर्व काही ठीक आहे, असे चाहत्यांना वाटत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'दोघेही शेवटी एकत्र आहेत.' एकाने लिहिले, 'ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट झालेला नाही, आशा आहे की, आता त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'अभिषेक आणि ऐश्वर्या अजूनही एकत्र आहेत हे पाहून आनंद झाला.'

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा तेव्हा चर्चेत आल्या, जेव्हा ते दोघे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात वेग-वेगळे पोहोचले होते. लग्नात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत दिसली होती, तर अभिषेक आपल्या कुटुंबासह लग्नाला उपस्थित होता. यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक एकदाही एकत्र दिसले नाहीत. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत दिसली. त्यामुळे घटस्फोटाच्या अफवांना उधाण आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+