ऐश्वर्या राय की श्वेता बच्चन... वहिनी आणि नणंद यांच्यात श्रीमंत कोण? हे ऐकून मोठा धक्का बसेल
Aishwarya Rai and Shweta Bachchan net worth: बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ऐश्वर्या भलेही फिल्मी जगापासून दूर असेल, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. बच्चन कुटुंबातील मतभेद असोत किंवा मग पतीसोबत विभक्त झाल्याच्या अफवा असोत. ऐश्वर्या मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चनसोबतच्या बाँडिंगवर अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अशा परिस्थितीत आज या दोघींच्या नेट वर्थबद्दल जाणून घेऊया.
ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन या दोघीही मोठ्या संपत्तीच्या मालक आहेत. दरम्यान विशेष म्हणजे दोघींच्या निव्वळ संपत्तीमध्ये खूप मोठा फरक आहे. ऐश्वर्या आणि श्वेता बच्चन या दोघींच्या संपत्तीत मोठा फरक आहे. तसेच या दोघींच्या संबंधित अशा गोष्टींबद्दल बोलूया, ज्या कदाचित चाहत्यांना माहित नसतील.

ऐश्वर्या रायने तिच्या करिअरमध्ये 45 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून तिचे अनेक चित्रपट सुपर-डुपर हिट ठरले आहेत. जया बच्चन यांनी 28 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या त्यांच्या काळातील सुपरस्टार होत्या. जया बच्चन यांनी आताच्या काळातील चित्रपटातही काम केले आहे.
ऐश्वर्या राय करोडोंची मालकिन आहे
ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 862 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या देखील तिच्या चित्रपटांसाठी खूप मोठी फिस घेते. ती केवळ चित्रपटांसाठीच नाही तर विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून 6 ते 7 कोटी रुपये घेते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या राय बॉलीवूड चित्रपटासाठी सुमारे 10 कोटी रुपये इतकी मोठी फी घेते.
ऐश्वर्या रायने कतरिना कैफ, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा सारख्या अभिनेत्रींना नेट वर्थच्या बाबतीत मागे टाकले आहे. ऐश्वर्या रायची संपत्ती पती अभिषेक बच्चनच्या संपत्तीपेक्षा तिप्पट आहे. अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 280 कोटी रुपये आहे.
श्वेता बच्चन किती कोटींची मालक आहे?
श्वेता बच्चनबद्दल सांगायचे तर तिने तिच्या आई-वडिलांप्रमाणे फिल्मी जग निवडले नाही. त्यापेक्षा श्वेताने स्वतःसाठी व्यवसायाचा मार्ग निवडला. श्वेता बच्चनने बिझनेस जगतात प्रसिद्ध असलेल्या निखिल नंदासोबत लग्न केले आहे. तिच्या पतीची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये असली तरी, ज्या एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत.त्याचे मुल्य 7014 कोटी रुपये आहे. श्वेता बच्चनबद्दल बोलायचे झाले तर तिची एकूण संपत्ती 160 कोटी रुपये आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी जुहू येथे तिला बच्चन हवेली प्रतीक्षा गिफ्ट केल्यानंतर श्वेताची एकूण संपत्ती थेट 50 कोटींनी वाढली आहे. या हवेलीची किंमत 50 कोटी रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications