Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या पत्नीचा नागपूरात कार अपघात, अभिनेत्याने दिली तब्येतची अपडेट

Sonu Sood Wife Accident: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याची पत्नी सोनाली सूद हिचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात मुंबई-नागपूर महामार्गाजवळ झाला.

सोनालीची गाडी एका ट्रकला धडकली आहे. या अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर जखमी झाली नाही. सध्या सोनाली नागपूरमध्ये असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 25 मार्च रोजी सकाळी सोनू सूद आपल्या पत्नीला भेटण्यासाठी नागपूरला पोहोचला असल्याची माहिती आहे.

sonu sood wife sonali sood accident

याबद्दल, viralbhayani यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टनुसार 24 मार्च 2025 रोजी सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई-नागपूर महामार्गावर कार अपघात झाला होता. यावेळी सोनाली तिच्या बहिणी आणि पुतण्यासोबत प्रवास करत होती. पोस्टनुसार गाडी चालकाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे.

सोनू सूदने दिली तब्येतीची अपडेट

अभिनेता सोनू सूदने त्याची पत्नी सोनाली सूदच्या अपघाताबद्दलही अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की सोनाली ठीक आहे. ती सुखरूप बचावली हा एक चमत्कार आहे. ओम साई राम, असं त्यांने म्हटलं आहे. सोनू सूदच्या पत्नीचा अपघात झाला आहे पण काळजी करण्यासारखे काही नाही.

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, सोनाली आणि तिच्या पुतण्याला पुढील 48-72 तास निरीक्षणाखाली ठेवले जाईल. अपघाताच्या वेळी सोनालीची बहीणही गाडीत होती. तिला किरकोळ दुखापत झाली आहे आणि प्रकृती धोक्याबाहेर आहे.

सोनाली-सोनूची प्रेमकहाणी नागपुरात सुरू झाली होती

सोनाली सूद नागपुरातच शिक्षण घेत होती. सोनू सूदची प्रेमकहाणी नागपूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सुरू झाली होती, एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या सोनालीची पहिली भेट ही नागपूरात झाली होती. चित्रपटात येण्यापूर्वी सुरू झालेली ही प्रेमकहाणी पुढे चालू राहिली आणि दोघांनीही दीर्घ डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही लग्न 25 सप्टेंबर 1996 रोजी झाले. सोनू सूद आणि सोनाली आता दोन मुलांचे पालक आहेत. सोनालीला प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंद करते. क्वचितच ती कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्ट्यांमध्ये दिसते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+