बॉलिवूड अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण घ्या जाणून
Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी वॉरंट जारी केलं आहे. तसेच मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) पोलिस स्टेशनच्या प्रभारींना अभिनेता सोनू सुदला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोनू सूदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
आता अभिनेता सोनू सूदने या प्रकरणात अधिकृतपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोनू सूदने म्हटले आहे की त्याला एका प्रकरणात साक्षीदार होण्यासाठी बोलावण्यात आले होते. तसेच आपला या प्रकरणात कोणताही सहभाग नाही. अभिनेता म्हणाला की हे खूप दुःखद आहे की सेलिब्रिटी सहजपणे टार्गेट बनतात.
लुधियानाच्या एका न्यायालयाने सोनू सूदविरुद्ध फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे. सोनू सूदने त्याच्या एक्स हँडलवर लिहिले आहे - आपल्याला हे स्पष्ट करावे लागेल की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरणाऱ्या बातम्या खूपच खळबळजनक आहेत.
सोनू सूदने दिले असे स्पष्टीकरण
सोनू सूद पुढे म्हटलं आहे की, ना मी ब्रँड अॅम्बेसेडर आहे ना कोणत्याही प्रकारे त्याच्याशी संबंधित जोडलो नाही. हे फक्त माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक आहे. सेलिब्रिटी सहजपणे कोणाचेही टार्गेट बनतात हे खूप दुःखद आहे. या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे, अश मागण ही त्याने केली आहे.
न्यायालयाने अटकेचे आदेश दिले
लुधियानाच्या एका न्यायालयाने सोनू सूदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी वॉरंट जारी केले आणि मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) पोलिस स्टेशनच्या प्रभारींना अभिनेत्याला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
-एएनआय वृत्तसंस्थेच्या मते, न्यायालयाने सोनू सूदला समन्स पाठवण्याचा आदेश दिला आहे, परंतु त्याने साक्ष देण्यास नकार दिला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले जाईल.
10 फेब्रुवारीला होणार सुनावणी
सोनू सूदने लिहिले आहे- मला या प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार म्हणून बोलावले होते. माझा याच्याशी कोणताही संबंध नाही. माझ्या वकिलाने उत्तर दिलं आहे. येत्या 10 फेब्रुवारी 2025 रोजी मी माझा जवाब नोंदवेल, जे या प्रकरणात माझा सहभाग नसल्याचे स्पष्ट होईल.
काय आहे प्रकरण ?
सोनू सूदचे हे संपूर्ण प्रकरण लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीशी संबंधित आहे. वकील राजेश खन्ना यांनी आरोप केला आहे की, मोहित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने त्यांना 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
-राजेशच्या म्हणण्यानुसार, त्याला रिझिका कॉईन नावाच्या बनावट कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. या प्रकरणात सोनू सूदला साक्ष देयची होती. पण समन्स पाठवूनही सोनू सूद न्यायालयात हजर झाला नाही. सध्या या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications