मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर होती, अभिनेता सोनू सुदने केला खुलासा
Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोना महामारीच्या काळात गरीब आणि गरजूंना मदत करणारा लाखो लोकांना मदत केली आहे. त्यामुळे तो सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतो. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान परदेशात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना आणि लोकांना मदत करण्यासाठी आपली मालमत्ता गहाण ठेवणारा मसिहा सोनू सूद याने आता एक मोठा खुलासा केला आहे.
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता सोनू सूदने खुलासा केला की, अनेक नामवंत राजकीय व्यक्तींनी महत्त्वाच्या राजकीय पदांसाठी आपल्याशी संपर्क साधला होता. मला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर देण्यात आली होती. यासोबतच सोनू सूदनेही आपल्या मुलाखतीत खुलासा केला की, त्याने या मोठ्या ऑफर्स का नाकारल्या आहेत?

ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूद म्हणाला, "मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, जेव्हा मी नकार दिला, तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे सांगितले. अभिनेत्याने सांगितले की, ज्यांनी त्याला ही ऑफर दिली ते खूप प्रभावशाली लोक आहेत.
सोनू सूदने केला खुलासा
सोनू सूदने सांगितले की, जेव्हा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला तेव्हा त्या प्रभावशाली लोकांनी मला राज्यसभेचे सदस्यत्वही देऊ केले आणि मला सांगितले की, तुम्हाला राजकारणात कशासाठीही लढण्याची गरज नाही.
माझ्यासाठी हा एक रोमांचक क्षण होता
अभिनेता सोनू सूद म्हणाला, माझ्या आयुष्यातील हा एक अतिशय रोमांचक टप्पा होता, जेव्हा असे शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक तुम्हाला भेटू इच्छितात आणि तुम्हाला जगात बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित करतात.
सोनू सूदने ऑफर का नाकारली?
सोनू सूद म्हणाला की, लोक दोन कारणांसाठी राजकारणात येतात, एक पैसा कमावण्यासाठी आणि दुसरे सत्ता मिळविण्यासाठी. मला या दोघांमध्येही रस नाही. जर आपण लोकांना मदत करण्याबद्दल बोललो तर मी आधीच लोकांना मदत करत आहे. मला मदतीसाठी कोणाला विचारण्याची गरज नाही. मग तो कोणत्याही जातीचा, भाषेचा, धर्माचा असो. माझा स्वतःहून लोकांना मदत करण्यावर विश्वास आहे.
मला भीती वाटते
मला इतर कोणाला तरी जबाबदार राहण्याची भीती वाटते. राजकारणात गेल्याने माझे स्वातंत्र्य गमावण्याची भीती वाटते. मी राजकीय पदे स्वीकारल्यास मला उच्चस्तरीय सुरक्षा आणि पदासोबत दिल्लीत घर मिळेल, असं सोनू सूद म्हणाला.












Click it and Unblock the Notifications