अभिनेता श्रेयस तळपदेवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप, उत्तर प्रदेशात गु्न्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता एका नवीन कायदेशीर अडचणीत सापडला आहे. उत्तर प्रदेशात श्रेयस तळपदे आणि इतर 14 जणांविरुद्ध फसवणुकीचा एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
श्रेयस तळपदेवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रेयस तळपदेवर कोट्यवधी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. हा चिट फंड घोटाळा उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एका दशकाहून अधिक काळ सुरू असल्याचा आरोप आहे. आयएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार श्रेयस तळपदे आणि इतर आरोपी लोणी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नावाच्या कंपनीशी संबंधित होते. या कंपनीने गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गावकऱ्यांनाकडून पैसे घेण्यात आले.

कंपनीच्या एजंटांनी स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले होते. त्यांची गुंतवणूक थोड्याच वेळात दुप्पट होईल या आश्वासनाने त्यांना आमिष दाखवण्यात आले. जेव्हा योजनेबद्दल कायदेशीर प्रश्न उद्भवले तेव्हा एजंटांनी त्यांचे काम थांबवले आणि ते जिल्ह्यातून गायब झाले. आता महोबातील श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
गोमती नगर पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल
याआधीही श्रेयस तळपदेचे नाव पैशांच्या फसवणुकीच्या प्रकरणात समोर आले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये श्रेयस तळपदे आणि अभिनेते आलोक नाथ यांच्याविरुद्ध लखनऊमध्ये गुंतवणूकदारांची 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार गोमती नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
हरियाणातील सोनीपत येथील मल्टी-लेव्हल मार्केटिंग फसवणूक प्रकरणात श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांची नावे समोर आली होती. या फसवणूक प्रकरणात इतर अनेक कलाकारांची नावेही समोर आली होती. श्रेयसने अद्याप त्याच्यावरील आरोपांवर कोणतेही भाष्य केलेले नाही.
श्रेयस तळपदेचे आगामी प्रॉजेक्ट
श्रेयस तळपदेकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार, संजय दत्त, रवीना टंडन, अर्शद वारसी, परेश रावल असे कलाकार दिसणार आहेत. याशिवाय श्रेयस तळपदे देखील 'हाऊसफुल 5' चित्रपटाचा एक भाग आहे.












Click it and Unblock the Notifications