Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लॉरेन्स बिश्नोईच्या जीवे मारण्याच्या धमक्यावर सलमान खानने केलं भाष्य, म्हणाला 'जेवढं आयुष्य...'

Salman Khan on Death Threat- बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला सध्या त्याच्या सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भाईजानच्या या आगामी चित्रपटाबद्दल लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची क्रेझ पाहायला मिळत आहे. सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या निमित्ताने म्हणजेच 30 मार्च 2025 (रविवार) रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मागील दिवसांपासून सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानने मुंबईतील काही ठराविक माध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला आहे. सलमान खानने लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळत असलेल्या धमक्याच्या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. या धमक्यांबाबत त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की 'जेवढं आयुष्य लिहिलं असतं ते तितकचं मिळणार '. सलमान खानची ही प्रतिक्रिया आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Salman Khan On Lawrence Bishnoi

यावेळी सलमान खान खूपच गांभीर्याने मीडियाच्या प्रश्नांना अतिशय काळजीपूर्वक उत्तरे देत होता. मग ते रश्मिका मंदान्नासोबतच्या वयाच्या फरकाबद्दलचे उत्तर असो किंवा सोशल मीडियावर त्याला ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दलचे त्याचे मत असो. सलमान खानने जीवे मारण्याच्या धमक्यांवर अल्लाह आणि देवावर विश्वास व्यक्त केला आहे.

सलमान खान पुढे बोलताना म्हणाला की "देव, अल्लाह, एकत्रच आहेत. माझ्यासाठी जे वय लिहिले आहे तेवढेच बस्स आहे." सलमान खानने या धमक्यांबद्दल जास्त विचार करणे सोडून दिले आहे. आता सलमान खानचे चाहते यावर सतत कमेंट करत आहेत आणि त्याला शुभेच्छा देत आहेत.

सलमान खानला मागील काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून दररोज जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. मागील वर्षी सलमान खानचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकीची लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून हत्या करण्यात आली . त्यानंतर सलमान खानच्या घरावर हल्ला झाला. महाराष्ट्र सरकारने सलमान खानला सुरक्षा पुरवली आहे.

सिंकदर चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा

सलमान खानचे गेल्या काही चित्रपटांना तेवढी चांगली कामगिरी करता आली नाही आणि म्हणूनच सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट त्याचा पुनरागमन चित्रपट म्हणून पाहिला जात आहे. हा चित्रपट गजनी चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगदास यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल दिसणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+