बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानकडे आहे अब्जावधींची मालमत्ता, घ्या जाणून
Saif Ali Khan News: बॉलिवूड अभिनेता आणि छोटे नवाब सैफ अली खानवर काल मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे बॉलिवूडसह देशभरात खळबळ उडाली आहे. सैफ अली खानवरील चाकू हल्ला हा केवळ त्याच्या चाहत्यांसाठीच नाही तर संपूर्ण बॉलिवूडसाठी मोठा धक्का आहे. या हल्ल्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही घटना गुरुवारी पहाटे 3 च्या सुमारास घडली आहे. सैफच्या घरात मध्यरात्री चोर शिरला त्यावेळी नोकर आणि चोरामध्ये झटपट झाली. या गोंधळाच्या आवाजाने सैफ जागा झाला आणि त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या चोराने सैफवर सपासप चाकूने 6 वार केले आहेत, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

सैफला त्याच्या नोकरांनी ताबडतोब मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, सैफवर आता रुग्णालयात सर्जरी करण्यात येत आहे. सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचं पथक स्थापन करण्यात आलं आहे.
जाणून घ्या कोण आहे 'भोपाली नवाब' सैफ अली खान?
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर नुकत्याच झालेल्या चाकू हल्ल्याने एक खळबळ उडाली आहे. चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी त्याच्यावर चाकू हल्ला झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या गुगल ट्रेंडमध्ये सैफ अली खान टॉपवर आहे. सैफ बद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. सैफ अली खानला भोपाळच्या राजघराण्यातील भोपाली नवाब म्हणून ओळखले जातं. भोपाळमध्ये त्यांची अब्जावधींची मालमत्ता आहे, जी त्यांच्या शाही वारशाचा आणि कौटुंबिक वारशाचा भाग आहे.
सैफ अली खानची एकूण संपत्ती
भोपाळची राजधानीत अब्जावधींच्या मालमत्तेचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाकडे हजारो एकर जमीन आहे, ज्यामध्ये जुन्या भोपाळच्या अर्ध्याहून अधिक जमीन आणि आजूबाजूच्या जंगलांचा समावेश आहे. ही मालमत्ता केवळ त्याच्या चित्रपटांमधून मिळवलेल्या संपत्तीचा एक भाग नाही तर ती त्याच्या राजघराण्याच्या वारशाचे प्रतीक आहे. सैफ आणि त्याचे कुटुंब या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी अनेकदा भोपाळला येतात. यासोबतच या मालमत्तेबाबत अनेक वाद सुरू आहेत, ज्यांच्या निराकरणासाठी त्यांना वेळोवेळी न्यायालयात जावे लागते.
सैफ अली खानची मोठी मुलगी सबा अली अनेकदा भोपाळला भेट देते आणि औकाफ-ए-शाहीच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी येथील न्यायालयात हजर राहते. हे कुटुंब केवळ स्वतःच्या इस्टेटची काळजी घेत नाही तर अनेक ऐतिहासिक मालमत्ता आणि साम्राज्यांच्या जीर्णोद्धारात देखील सहभागी आहे. हे सर्व असूनही, या मालमत्तेवरील वाद कधीच कमी होताना दिसत नाही आणि हे कुटुंब नेहमीच चर्चेत असते.
फ्लॅग हाऊस
भोपाळमध्ये आणखी एक अब्ज किमतीची मालमत्ता आहे, जी फ्लॅग हाऊस म्हणून ओळखली जाते. याच संपत्तीबद्दल न्यायलयात वाद सुरु आहेत. फ्लॅग हाऊसमध्ये नवाबी काळातील ऐतिहासिक वारसा आहे. यामध्ये नवाबी काळातील अनेक प्राचीन वस्तू आहेत, ज्या त्यांच्या ऐतिहासिक मूल्यामुळे खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तथापि, कालांतराने अनेक नातेवाईकांनी मालमत्ता काढून घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मालमत्तेचा वाद आणखी वाढत गेला . या फ्लॅग हाऊसची किंमत एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढते.
रॉयल पतौडी पॅलेस
सैफ अली खानच्या कुटुंबाची शाही मालमत्ता असलेला पतौडी पॅलेस देखील खूप प्रसिद्ध आहे. ही मालमत्ता आता हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित झाली आहे. पतौडी पॅलेसची किंमत सुमारे 800 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. हा राजवाडा केवळ एक ऐतिहासिक वारसा नाही तर आजकाल पर्यटकांसाठी आणि बॉलिवूड चित्रपटांसाठी आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र बनला आहे. आतापर्यंत पतौडी पॅलेसमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झालं आहे. मंगल पांडे, वीर झारा, रंग दे बसंती आणि लव्ह सारखे मोठे चित्रपट या पॅलेसमध्ये या चित्रपटांची शुटींग झाली आहे.
चित्रपटांमधील नवाबी वाडे
सैफ अली खानच्या कुटुंबाचे अनेक हवेली आणि बंगले बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसतात. विशेषतः हरियाणातील पतौडी पॅलेसचा वापर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी केला जातो. याशिवाय, चिकलोड कोठी हे आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालं आहे. या हवेल्या आणि राजवाड्यांचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व त्यांना चित्रपटांसाठी आदर्श स्थान बनवते. ही ठिकाणे नवाबी राजघराण्याचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती जिवंत ठेवतात.












Click it and Unblock the Notifications