सना मकबूल 'बिग बॉस OTT 3'ची विजेती, जाणून घ्या तिच्या संपत्तीबद्दल

Bigg Boss OTT 3: सना मकबूलला बिग बॉस OTT 3 च्या विजेत्याचा मुकुट देण्यात आला आहे. सनाने अखेर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. तिच्यासोबत अंतीम फेरीत नेझी, साई केतन राव, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे चार विजेतेच्या शर्यतीत होते. पण या चारही स्पर्धकांना मागे टाकत सना मकबूलने या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

बिग बॉसच्या ट्रॉफीसह सनाला तब्बल 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. अशा परिस्थितीत,तिच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया...

सना जावेद हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. BB OTT 3 चा ट्रॉफी जिंकून ती आज प्रसिद्ध झाली असेल, पण सनाच्या आयुष्यात खूप संघर्ष झाला आहे. इतर कलाकारांप्रमाणे सनानेही खूप त्रास सहन केला आहे. तिचा इथंपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता.

sana maqbool

सना मकबूलने 2011 मध्ये मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले. कितनी मोहब्बत है, इस प्यार को क्या नाम दूं आणि थ्रिलर मालिका अर्जुनमध्येही काम केले आहे. यासोबत सना खतरों के खिलाडी 11 चा देखील एक भाग होती.

जागरण टीव्हीच्या वृत्तानुसार सना मकबूलच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर, सना मकबूलची अंदाजे संपत्ती सुमारे 2 कोटी रुपये आहे. बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती झाल्यानंतर सना मकबूलचे नशीब चमकेल की नाही हे येणारा काळच सांगेल.

सना मकबूलचे चाहते यावेळी खूप खूश आहेत. शो जिंकल्यानंतर लवकरच सनाला चित्रपटात पाहायचे आहे. कमेंट सेक्शनच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना चाहत्यांनीच हे सांगितले. सना मकबूलला विजेती म्हणून पाहणे हे अनेकांचे स्वप्न होते. शोमध्ये सर्वांनी सनाकडे बोटे दाखवली असली तरी, अखेरीस सना मकबूलने शो जिंकून सर्वांची बोलती थांबवली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+