'ती' मुलं पटवायचा परफ्युम मारते मग, तिला कुणीच..राखीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री! निक्कीचा चेहरा पडला
Bigg Boss Marathi Season 14 : हल्ली बिग बॉसच्या घरात पाहुण्यांच्या येण्याचा सीजन सुरु झाला आहे. अगदी शेवटच्या काही एपीसोडमध्ये कंटेस्टन्सची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली गेली. हा सोहळा प्रेमाचा धागा किती घट्ट असतो याची प्रचिती आणणारा होता. आता कुटुंबातील नातेवाईक गेल्यानंतर सिने इंडस्ट्रीमधील काही कलाकार बिग बॉसच्या घरात येणं सुरु झालं आहे. अगदी कालच्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध कलाकार राखी सावंत हिने एंट्री केली अन् पाहतो तर काय निक्कीचा चेहराच पडला...
निक्की तांबोळी हे नाव सध्या मराठी बिग बॉसमध्ये खूप गाजतेय. अरबाजसोबत सुरु असलेली मैत्री असो की, त्यानंतर एकमेकांचे नको तितकं जवळ येण असो..या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांच्या समिश्र प्रतिक्रीया आल्या आहेत. अरबाजचं एलिमिनेट होणं निक्कीसाठी खूप मोठा धक्का होता. ती स्वतःच या धक्क्यातून सावरण्यासाठी दुसरा दिवस उजाडावा लागला असे म्हणते. अर्थात एकमेकांचा खेळ एकमेकांच्या आधारावर होता हेही यातून स्पष्ट झालयं. हा विषय झाला निक्की अन् अरबाजचा पण पुढे काय गंमत घडली हे वाचा..

विशेषतः बिग बॉसचा मराठी सीजन शेवटच्या टप्प्यांवर येऊन ठेपलाय. आता या सीजनमध्ये पाहुणे कलाकार काही वेळ घालवण्यासाठी येत आहे. पहिली एंट्री म्हणाल तर अर्थातच मागचा मराठी सीजन गाजवणाऱ्या राखीची होती. ती आली तेव्हा सर्वचजण स्तब्ध झाले..काही जण आवाक् झाले तर निक्की तांबोळीचा चेहराच पडला. याला कारणही तसंच आहे ..निक्की आणि राखी मागच्या एका हिंदी सीजनमध्ये सोबत होत्या आणि तिथं त्यांचं नातं विळ्याभोपळ्यासारखं होतं. त्यामुळे जेव्हा राखीची एंट्री झाली तेव्हा निक्कीचा चेहऱ्यावर आनंद कसा राहील बरं..
एंट्रीवेळी काय घडलं
जेव्हा राखी एंट्री करणार हे निक्कीच्या लक्षात आलं तेव्हा हाय रब्बा इथं हि कशाला आलीय असं निक्कीला वाटलं चेहऱ्यावरचे हावभावही खूप काही सांगून जात होते. जणू ती जाम घाबरलीच अशीच तिची काहीस्थिती होती. कदाचित निक्कीला राखीचं येणं आवडलं नसावं कारण निक्कीचे मागच्या एपिसोडमधले गुपितं राखीकडं नसतील तर नवलच होय ना...
राखीनं घेतली निक्कीची 'शाळा'
राखीने घरात पाऊल ठेवल्यावर निक्कीची 'शाळा' घेण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, "सस्ती राखी सावंत...हा काय प्रकार? ही त्या सीझनमध्ये होती...तिथे एकाही मुलाला सोडलं नाही. ओ वर्षा ताई ऐकलंत का? या कोपऱ्यात आय लव्ह यू... त्या कोपऱ्यात आय लव्ह यू बोलून ही शेवटपर्यंत राहिली आणि बाकी सगळे बाहेर गेले."
राखी पुढे निक्कीला विचारते, "अरबाजचा साखरपुडा झालाय हे खरंय का?" यावर निक्की काहीच उत्तर देत नाही. हे पाहून पुढे राखी म्हणते, "ही कोपऱ्यात बसून रडत होती...त्याचा कप घेऊन बसलेली...सारखं मिस करतेय, मिस करतेय. राणी एकटी पडली माझा राजा बाहेर आहे असं सगळं सुरू होतं."असं म्हणायच्या आधी काॅफीवरुन निक्कीला राखीनं चांगलचं घेरलं इथं निक्कीचा चेहरा पाहण्यासारखा होता.
"प्रत्येक सीझनमध्ये तुझ्या फिलिंग्ज बाहेर येतात. तुम्ही बाहेर जाऊन हे सगळं आधीच्या सीझनचं बघा. ही मस्त परफ्युम मारते...ती मुलं पटवण्याचा परफ्युम मारते आणि जाते... मग, हिला कोणीच नॉमिनेट करत नाहीत." असंही राखी यावेळी म्हणाली.
एक आठवडा गाजवा
राखीने निक्कीची फिरकी घेतल्यानंतर अगदी वर्षा उसगावकर यांचे पाय धरत आशीर्वादही घेतले. यानंतर सर्वांशी भेटून ती शेवटी म्हणाली, "हा सीझन सुपरडुपर हीट आहे. आता एक आठवडा गाजवून टाका, वाजवून टाका." राखी जरी असं म्हटली तरी आता आठपैकी एका सदस्याला एलिमेनेट व्हावं लागणार आहे तो कोण असेल हे कळेलच.












Click it and Unblock the Notifications