Bigg Boss Marathi 5 :आज ग्रँड फिनाले, कोण होणार विजेता? सोशल मीडियावर आली यादी, आमची ही शक्यता, वाचा
Bigg Boss Marathi 5 : यंदाचा बिग बाॅस मराठीचा सीजन सुपर डुपर हिट ठरला. आतापर्यंत कोणताही मराठीचा सीजन एवढा जोरदार झाला नाही तेवढा 'बिग बॉस 5' हा सीजन हिट ठरला. खास गोष्ट म्हणजे आज बिग बाॅस मराठी पाचव्या सीजनचा ग्रँड फिनाले आहे. आज रात्री यातल्या विजेत्याच्या ग्रँड फिनाले असून यात ही घोषणा होणार आहे.
'बिग बॉस 5' हा सीजन खासकरुन निक्की तांबोळी आणि अरबाज यांनी गाजवला असं बोललं जात आहे. पण त्यांच्या रासलिलाच जास्त गाजल्या. पण त्या प्रेक्षकांना पसंती पडल्या नाही हेही तितकचं खरं आहे. बिग बाॅसमधील सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं सर्वांनीच आपल्या परिने उत्कृष्ट खेळ केला.

बिग बाॅसचा शो धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यामुळे 'बिग बॉस' शो रंगला. तर आता हेच स्पर्धक आता फायनल राऊंडमध्ये आहेत. आज यांच्यापैकी एक बिग बाॅस सीजन पाचचा विजेता होणार आहे. आज यातल्या एका विजेत्याचं नाव घोषित होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांची आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात कोणता स्पर्धक 'बिग बॉस 5' शोची ट्रॉफी घरी घेऊन जाईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये निक्की - अरबाज यांच्यातील कनेक्शन, सूरजचा झापूक झुपूक अंदाज, इतर स्पर्धकांचे वाद, अपमान आणि टास्कची चर्चा रंगली आहे. घरातील दमदार स्पर्धांमुळे टीआरपी लिस्टमध्ये देखील हा शो अव्वल स्थानी असल्याची घोषणा बिग बाॅसने कालच केली आणि सेलिब्रेशनही झाले आहे.
कोण होणार विजेता सोशल मीडियावर लिस्ट
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वोटिंग लिस्टनुसार, पहिल्या स्थानी सूरज चव्हाण आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अभिजीत, धनंजय यांचा क्रमांक लागतो. वोटिंग लिस्टनुसार निक्की आणि जान्हवी शेवटी आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळी विजेता कोण असेल हे स्पष्ट होईल.
तु्म्ही आम्हाला विचाराल तर आम्ही सांगतो की, या स्पर्धेचा विजेत्याचां विचार केल्यास...
- Bigg Boss Marathi 5 चा विजेता अभिजित सावंत होण्याची शक्यता जास्त आहे, पण सुरज चव्हाण हाही विजेत्याच्या यादीत चमकू शकतो.
- या शर्यतीत धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर थोडी मागे पडलेले दिसते.
- निक्की तांबोळी तितकीच दावेदार असली तरीही तिची यावेळी विजेतेपदाची संधी हुकू शकते कारण प्रेक्षकांना तिचा राडा आवडतो पण स्वभावाबद्दल सांगायचे झाले तर अनेकजण नापसंती दर्शवतात.
- अंकिता वालावलकर ही सौज्वळ आणि विनम्र असल्याचे प्रेक्षक सांगतात त्यामुळे ती एखाद्यावेळी सुर मारु शकते आणि पहिल्या क्रमांकावर येऊ शकते.
हे फक्त आमचे अंदाज आहे प्रत्यक्षात आज रात्री अर्थात 6 ऑक्टोबर रोजी कोण बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोण काय आहे...घ्या जाणून
- अभिजीत सावंत याच्याबद्दल सांगयचं झालं तर, गायक म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. 'बिग बॉस'च्या घरात देखील अभिजीत उत्तम खेळला आहे.
- धनंजय पोवार हा प्रसिद्ध रीलस्टार आहे. तो कुटुंबवत्सल आणि वडीलांना आदर्श मानणारा आहे.
- जान्हवी किल्लेकर ही अभिनेत्री आहे. तिने कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत 'सानिया' हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. त्यासोबतच ती 'श्री स्वामी समर्थ' या मालिकेतही झळकली.
- निक्की तांबोळीने तेलुगू आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाड़ी' मध्ये देखील निक्की झळकली आहे.
- सुरज चव्हाण हा रिल्सस्टार आहे आपल्या झापूक-झुपूकमुळे तो चर्चेत असतो.
- अंकिता ही रिल्सस्टार तर आहेत पण ती उत्तम गृहीणी आहे तिला चांगला स्वंयपाक जमतो हेही काही कमी नाही.












Click it and Unblock the Notifications