Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bigg boss 19 winner leaked: 'बिग बॉस 19' ग्रँड फिनालेपूर्वीच विजेता लीक! मेकर्सनी ऐनवेळी बदलला प्लॅन

Bigg boss 19 winner leaked : ज्या क्षणाची 'बिग बॉस १९' चे चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो ग्रँड फिनालेचा क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ७ डिसेंबर रोजी या सीजनचा विजेता कोण ठरणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जोरदार तयारी सुरू असतानाच, अचानक एका मोठ्या माहितीने खळबळ उडवून दिली आहे. विजेत्याचे नाव जाहीर होण्यापूर्वीच, एका प्रसिद्ध एक्स-कंटेस्टंटने विजेत्याचे नाव 'लीक' झाल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे!

Bigg boss

तहलका भाईने उडवली खळबळ: मेकर्सने बदलला निर्णय!

'फिल्मी बिट'नुसार, 'बिग बॉस १७' चा स्पर्धक तहलका भाई (सनी आर्या) याने नुकताच एक व्हिडिओ शेअर करून हा धक्कादायक दावा केला आहे. तहलका भाईच्या म्हणण्यानुसार, शोच्या सेटवरून त्याला ही 'मोठी आणि १०० टक्के खरी' बातमी मिळाली आहे.

तहलका भाईचा दावा काय?

"सर्व चाहते गौरव खन्ना याला शो जिंकवण्याचा प्रयत्न करत असताना आणि त्यालाच विजेता मानत असताना, मला सेटवरून एक फोन आला. या फोननुसार, मेकर्सनी ऐनवेळी आपला प्लॅन बदलला आहे. आता ते गौरव खन्नाऐवजी दुसऱ्याच स्पर्धकाला विजेता बनवत आहेत, हे जवळपास १०० टक्के निश्चित झाले आहे." असा दावा 'तहलका भाई'चा केला आहे.

निर्णय बदलला की, 'पब्लिसिटी स्टंट'?

ऐन ग्रँड फिनालेच्या तोंडावर आलेली ही बातमी गौरव खन्नाच्या चाहत्यांसाठी मोठी तणावपूर्ण ठरली आहे. आता खरोखरच 'मेकर्स'ने शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला की हा केवळ एक 'पब्लिसिटी स्टंट' आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना आता ७ डिसेंबरच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहावी लागणार आहे

बिग बॉस १९ चा विजेता कोण?

'बिग बॉस १९' चा अधिकृत विजेता कोण आहे, हे उद्या (७ डिसेंबर) ग्रँड फिनाले मध्ये होस्ट सलमान खान जाहीर करतील. सध्याची चर्चा आणि अंदाज हा की, गौरव खन्ना आणि प्रणित मोरे यांच्यात चुरस असल्याचे दिसत आहे.तर विकिपीडियाच्या व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये आणि काही सोशल मीडिया पोस्ट्सनुसार गौरव खन्ना विजेता बनू शकतो असा दावा केला जात आहे.

'बिग बॉस'चा एक माजी स्पर्धक (तहलका भाई) शेवटच्या क्षणी मेकर्सनी गौरवला नाही, तर दुसऱ्याच स्पर्धकाला विजेता बनवण्याचा प्लॅन केल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे संभ्रम वाढला आहे. अंतिम निकाल हा केवळ शोच्या प्रसारणानंतरच स्पष्ट होईल, परंतु सध्या गौरव खन्ना आणि प्रणित मोरे हे विजेतेपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+