बिग बॉस 18 : 7व्या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये उलटफेर;8 स्पर्धकांची नावे जाणून घेतल्यास आश्चर्यचकित व्हाल
बिग बॉस 18 च्या सहाव्या आठवड्यात घरातून कोणालाही एलिमिनेट करण्यात आलेले नाही. या आठवड्याच्या शेवटी सलमान खान घरात परतला. कोणी ना कोणी घरातून नक्की बाहेर जाईल, अशी हवा आधी निर्माण करण्यात आली होती. मात्र शेवटी "नो एलिमिनेशन वीक"ची घोषणा बिग बॉसने केली आणि हे ऐकताच घरातील सदस्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.
यावेळी घराचा टाईम गॉड रजत दलाल आहे. याचा अर्थ असा आहे की तो घरातून नॉमिनेट होणार नाही. मात्र घरातील अन्य सदस्यांपैकी कुणाकुणाची नावे समोर येतील, याची बिग बॉसच्या सर्वच चाहत्यांना प्रतीक्षा आहे. नॉमिनेशनसाठी बिग बॉसच्या घरात जंगी पार्टी झाली. ज्यात घरातील सदस्यांना रजतने जेवण दिले आणि एका व्यक्तीला नॉमिनेट करणे आवश्यक होते. ज्याच्या वाट्याला सर्वात जास्त मते येतील तो नॉमिनेट होईल.

आठ सदस्य नॉमिनेट झाले
बिग बॉसच्या संदर्भात सोशल मिडीयावर विविध चर्चा नेहमीच होत असतात. माध्यमांत देखील त्याची चर्चा सुरु असते. सोशल मीडिया एक्सवर खबरी नामक एका अकाउंटवर एक पोस्ट करण्यात आली आहे ज्यात त्यांनी नॉमिनेशनची यादीच प्रसिद्ध केली आहे. यावेळी करणवीर मेहरा, व्हिव्हियन डीसेना, अविनाश मिश्रा, दिग्विजय राठी, कशिश कपूर, चाहत पांडे, एलिस कौशिक आणि ईशा मिश्रा यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. यापैकी ज्याला कमी मते मिळतील तो घराच्या बाहेर जाणार आहे. मात्र अजूनपर्यंत ही यादी अंतिम आहे असे सांगणे देखील अवघड आहे. कारण बिग बॉस नॉमिनेशन नंतर काही ना काही ट्विस्ट घेऊन समोर येतो आणि त्यात काही सदस्यांना संधी मिळते .यावेळी घरातील सगळ्यात तगडा ग्रुप म्हणजेच अविनाश, व्हीव्हीयन, एलीस आणि ईशा हे चौघेही नॉमिनेटेड आहेत. यापैकी कोण बाहेर जाणार हे कोणीही सांगू शकत नाही त्याचे उत्तर वेळच देणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोण जाणार घराबाहेर?
तेजिंदर पाल सिंह बग्गा या नॉमिनेशन पासून कसा वाचला, हा प्रश्न बिग बॉसच्या सगळ्या चाहत्यांना पडला आहे. तसेच संपूर्ण भाग पाहिल्यानंतरच कळणार आहे की रजत आपला मित्र दिग्विजय राठीला नॉमिनेशन पासून का वाचवू शकला नाही. नॉमिनेशनची यादी पाहून हा आठवडा उत्सुकतापूर्ण ठरणार आहे. बिग बॉसच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा वन इंडिया हिंदी. इथे आम्ही प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांची माहिती देत राहू.












Click it and Unblock the Notifications