'भूल भुलैया 3' तुम्हाला घाबरवण्यासोबतच हसवेल! हॉरर कॉमेडी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Bhulbhulaiyaya 3 Trailer : भुलभुलय्याचे दोन सिनेमे रसिकांनी डोक्यावर घेतल्यानंतर आता बहुप्रतिक्षित 'भूल भुलैया 3' आज या चित्रपटाचा ट्रेलर राज मंदिर सिनेमात लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाचे प्रमुख कलाकार, कार्तिक आर्यन, तृप्ती दिमरी आणि विद्या बालन यांच्या उपस्थितीसह हा कार्यक्रम अविस्मरणीय आणि रसिकांसाठी पर्वणी ठरणारा असेल.
भूल भुलैया 3 च्या टीझरने चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण केली आहे आणि सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसरा भाग हॉरर, कॉमेडी आणि सस्पेन्स यांचे मिश्रण आहे, हे कलात्मक अंग आणि पार्श्वभुमी याआधीच्या दोन भागांत होती आता तिसरा भाग प्रेक्षकांना आकर्षित करणारा ठरणार आहे.

विद्या बालन 'मंजुलिका'च्या भुमिकेत घाबरवणार..!
या चित्रपटाचे अनीस बज्मी दिग्दर्शित करत आहे, ज्यामध्ये विद्या बालन 'मंजुलिका' आणि कार्तिक आर्यन 'रूह बाबा'च्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळी दरम्यान 1 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कृष्ण कुमार मुराद खेतानी हे प्रड्युसर असून स्टोरी स्क्रिन प्ले आणि संवाद आकाश कौशिक यांनी लिहिले आहेत. तर प्रोडक्शन डिझायनर रजत पोद्दार हे आहेत. इडिटर संजय संकला हे आहेत.
ही आहे स्टारकास्ट..
रुहान रंधावा / रूह बाबा, भूल भुलैया 3 मध्ये त्याच्या भूमिकेत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, विजय राज, संजय मिश्रा, राजपाल यादव, अश्विनी काळसेकर इत्यादी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, विद्या बालन 17 वर्षांनंतर फ्रँचायझीमध्ये परतणार आहे आणि या चित्रपटात ती मंजुलिकाची भूमिका पुन्हा साकारणार आहे.
भूल भुलैया 3 बद्दल सांगायचे झाल्यात तो बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी आहे. भूल भुलैया आणि भूल भुलैया 2 नंतर हा हॉरर कॉमेडीचा तिसरा भाग आहे. आत्तापर्यंत, टीझर आणि पोस्टर्सने भूल भुलैया 3 च्या आसपास प्रचंड चर्चा निर्माण करण्यात व्यवस्थापित केले आहे आणि चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते.












Click it and Unblock the Notifications