Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bhool Chuk Maaf : 'भुल चुक माफ' राजकुमार राणाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

Bhool Chuk Maaf Box Office Collection 1st Day : छावाने चित्रपट गृहात मोठा गल्ला जमवल्यानंतर नंतर एकापेक्षा एक सरस चित्रपट येत आहे. सलमानखानचा चित्रपट आपटल्यानंतर अजय देवगण टाॅम क्रुझचा इम्पाॅसिबलनंतर आता राजकुमार राव याचा चित्रपट भुल चूक माफ काल 23 मे 2025 रोजी प्रदर्शित झाला.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांचा कॉमेडी ड्रामा चित्रपट 'भूल चुक माफ' थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आज पहिल्या दिवसाअखेर किती कमाई झाली याचीच उत्सुकता सर्वांना आहे. या चित्रपटाला लोकांनी भरपूर प्रतिसाद पहिल्या दिवशी पाहायला मिळाले.

Bhool Chuk Maaf Box Office Collection 1st Day


'भूल चुक माफ' हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे तर दुसरीकडे या चित्रपटाला लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत, परंतु चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे असेही काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांना चित्रपट आवडतोय हे मात्र उघड दिसत आहे.

भुल चूक माफ - प्रदर्शनाआधीच आव्हाने

'भूल चुक माफ'ची पहिल्या दिवसाची कमाईबाबत सांगायचे झाल्यास, राजकुमार रावचा 'भूल चुक माफ' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाला सामोरे गेला हे विशेषतः सांगावे लागेल. दरम्यान अनेक अडचणींना तोंड दिल्यानंतर, हा चित्रपट 23 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, कमाईआधीच या चित्रपटाने भरपूर आव्हाने पार केली आहेत. या चित्रपटासोबतच सूरज पंचोलीचा 'केसरी वीर' हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

भुल चूक माफ विरुद्ध रेड -2

अजय देवगणचा चित्रपट 'रेड - 2' हा महाराष्ट्र दिनी -कामगार दिनी प्रदर्शित झाला. अजय देवगणचा चित्रपट रसिकांना चांगलाच भावला, यासह या चित्रपटाने इम्पॅसिबललाही मागे टाकले. अशा स्थितीत रेड-2 ला प्रेक्षकांची चांगली पसंती आहे हे विसरुन चालणार नाही, त्यामुळे भुल चूक माफ या चित्रपटाला अजय देवगणच्या चित्रपटाशी स्पर्धा करावी लागणार आहे. तरीही पहिल्या दिवशी 'भूल चुक माफ'ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे.

राजकुमार रावच्या चित्रपटाची पहिल्या दिवशी किती कमाई किती?

  • सॅकोनिल्कच्या अहवालानुसार, 'भूल चुक माफ'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच भारतात पहिल्या दिवशी 6.75 कोटी रुपये कमावले आहेत. त्याच वेळी, 'भूल चुक माफ' ने त्याच्या रिलीजसह अनेक विक्रम केले आहेत.
  • राजकुमार रावच्या या चित्रपटाने 2025 च्या पहिल्या दिवशी 6.75 कोटी रुपये कमावून एक-दोन नव्हे तर 10 चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे.
  • 'भूल चुक माफ' ने 'द डिप्लोमॅट', 'क्रेझी', 'देवा', 'मेरे हसबंड की बीवी', 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' यांसारख्या चित्रपटांचा पहिल्या दिवशीचा कलेक्शन रेकॉर्ड मोडला आहे.

'भूल चूक माफ' चौथा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट

'भूल चूक माफ' हा राजकुमार रावचा चौथा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. 'भूल चुक माफ' हा चित्रपट राजकुमार रावचा चौथा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनला आहे. याने 'काई पो चे' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा (4.50 कोटी) मागे टाकला आहे. या चित्रपटाने 'जजमेंटल है क्या' (5.40 कोटी) आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' (5.71 कोटी) यांनाही मागे टाकले आहे आणि आता राजकुमार रावच्या पहिल्या 5 चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+