Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बांगलादेशचे लायसन्स सापडले, पत्ता सापडला आणि... सैफवर हल्ला प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६जानेवारीला प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने हा प्रकार केला होता. आता हा हल्लेखोर मुळचा बागलादेशचा असल्याचा पोलिसांचा दावा होता. याच दाव्याबाबत आता पोलिसांच्या हाती सबळ पुरावा लागला आहे. या नव्या पुराव्यातून पोलिसांना अजून काही प्रश्नांची उकल करता येणार आहे.

Attack on Saif Ali Khan

नेमकं काय सापडलं?

सैफवर हल्ला प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद याला अटक केली. त्याने गुन्हाही कबूल केला. आता हा आरोपी बांग्लादेशचा भारतात चोरुन राहतोय, असा पोलिसांचा दावा आहे. तो बांग्लादेशचा आहे, याबाबतचा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. शहजादचे ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना सापडले आहे.

काय आहे लायसन्सवर?

पोलिसांनी शहजादचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. ते लायसन्स बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट ऑथरिटीचे आहे. त्या मोहम्मद शहजाद याचे नाव व पत्ता आहे. त्यावरुन शहजाद हा बांगलादेशमधील बरिसल सदरचा असल्याचे समजले आहे. शहजादला हे लायसन्स 21 नोव्हेंबर 2019 ला बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट ऑथरिटीकडून देण्यात आले आहे. हे लायसन्स 21 फेब्रुवारी 2020 रोजी संपले आहे. हे लायसन दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी देण्यात आले आहे. यावर त्याची 12 मार्च 1994 अशी त्याची जन्मतारीखही दिसत आहे. तसेच यावर त्याचा फोन नंबरही नमूद करण्यात आला आहे. यासोबतच यावर त्याचा फोटोही पाहायला मिळत आहे.

बांगलादेशींवर कारवाई

ठाण्यातील कासारवडवली भागातून शहजादला अटक करण्यात आली होती. आता त्याच्याकडे बांगलादेशचे लायसन्स सापडल्याने भारतात अनधिकृत घुसलेल्या इतर बांगलादेशींचा मागमूसही सापडणार असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे सध्या ॲक्शन मुडमध्ये असून बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली जात आहे. झोपड्या, अनधिकृत बांधकामांमध्ये बांगलादेशी आश्रय घेत आहेत. तसेच यांनी बनावट पॅनकार्ड, आधारकार्डही बनवले आहेत. गेल्या महिनाभरामध्ये बांगलादेशातील संशयित म्हणून हजारोंपेक्षा अधिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 125 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 300 जणांचे कागदपत्र तपासण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+