Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL लिलावापूर्वीच KL राहुलला गूड न्यूज! अथिया शेट्टी प्रेग्नेंट; अण्णा होणार 'आजोबा'

Athiya Shetty- KL Rahul : अभिनेत्री अथिया शेट्टीने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. क्रिकेट केएल राहुल आणि अथिया शेट्टी आई बाबा होणार आहेत. अथियाने प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. हे कपल लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.

अलिकड्च्या काळात अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. यामध्ये दीपिका पदुकोण-रणवीर सिंह, रिचा चढ्ढा-अली फजल यांसह अनेक सेलिब्रिटी कपल्सचा समावेश आहे. आता आणखी एका सेलिब्रिटी कपलने गूड न्यूज दिल्याने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Athiya Shetty- KL Rahul

दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी गोड बातमी शेअर केली. हे जोडपं लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी आतुर आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी सोशल मीडियावर गूड न्यूज शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचं जानेवारी 2023 मध्ये लग्न झालं. आता दीड वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघेही पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

राहुल बऱ्याच दिवसांपासून फॉर्ममध्ये नाही

न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने १२ धावा केल्यानंतर विकेट गमावली. मात्र, त्याने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र तेव्हापासून तो बॅटने सतत आउट ऑफ फॉर्म आहे. अशा स्थितीत ही आनंदाची बातमी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीलाही नवे वळण आणू शकते.

केएल राहुलला मिळाली आनंदाची बातमी!

केएल राहुलने शुक्रवारी म्हणजेच 8 नोव्हेंबरला सांगितले की, त्याची पत्नी अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. त्यांच्या घरी नवीन पाहुणे येणार आहे. राहुलने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून ही आनंदाची बातमी शेअर करत त्याच्या चाहत्यांना याची माहिती दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+