मला एक्स-वाईफ म्हणू नका; एआर रहमानची तब्बेत बिघडल्यावर पत्नी सायराची असं का म्हणाली? वाचा
प्रसिद्ध संगितकार व ऑस्कर विजेते ए.आर. रहमान यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अपोलो हॉस्पिटल आणि त्यांचा मुलगा ए. आर. अमीन यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. एआर रहमान यांच्या पत्नी सायरा बानू यांनीही व्हॉइस नोटद्वारे त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि चाहत्यांना एक विशेष आवाहनही केले.

काय म्हणाली पत्नी सायरा?
सायरा यांनी सांगितले की, ए.आर. रहमान यांना छातीत दुखण्याची तक्रार होती. त्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. आता ते ठीक आहेत. सायराने असेही स्पष्ट केले की तिचा आणि ए.आर. रहमानचा घटस्फोट झालेला नाही. ते अजूनही पती-पत्नीच आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तिची तब्येत ठीक नसल्याने आणि रेहमानला तणावात ठेवायचे नव्हते म्हणून ते वेगळे झाले. सायराने सर्वांना तिला 'एक्स-वाईफ' म्हणू नका, असे आवाहनही केले.
रहमान यांना डिस्चार्ज
रहमान यांना रविवारी सकाळी डिहायड्रेशनची तक्रार आल्यानंतर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले. त्यांचा मुलगा अमीन यानेही चाहते आणि शुभचिंतकांचे आभार मानले. वडील आता बरे असल्याचे सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही एआर रहमान यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले.
स्टॅलिन यांची पोस्ट
तत्पूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एआर रहमानच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. स्टॅलिनने चाहत्यांना आश्वासन दिले की तो ठीक आहे. त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करताना, स्टॅलिन यांनी रहमान 'ठीक' असल्याची पुष्टी केली आणि लिहिले, 'ए.आर. रहमान आजारी असल्याची आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजताच मी डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली!' डॉक्टरांनी सांगितले की तो बरा आहे आणि लवकरच घरी परत येईल!












Click it and Unblock the Notifications