Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ए. आर. रहमानचं हिंदूतून इस्लाममध्ये धर्मांतर! श्रीमंत गायकांत गणना, वाचा किती आहे त्याची संपत्ती?

AR Rahman Net Worth : आपल्या समंजुळ स्वरांनी रसिकांच्या हृदयात गेल्या कित्येक वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा दिग्गज गायक आणि संगीतकार ए. आर. रहेमान यांच्या आवाजाचे भारतातच नव्हे तर परदेशातही लाखो चाहते आहेत. एआर रहमानची गणना भारतातील सर्वात श्रीमंत गायकांमध्ये केली जाते. मात्र, त्याच्या पत्नीने घटस्फोटाची घोषणा केली. यानंतर ए. आर. रहेमान याच्यासंदर्भात सर्व चर्चा समोर येत आहे. हिंदु धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यापासून ते सर्वात श्रीमंत गायक तो आहे.

श्रीमंत गायकामध्ये त्याची गणना केली जात आहे. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. आपण आज त्याच्या संपत्ती आणि घटस्फोटासंदर्भात माहिती घेऊया.

AR Rahman Net Worth and Car Collection Saira Banu Marriage Divorce

29 वर्षानंतर दोघेही वेगळे होणार

19 नोव्हेंबर रोजी ए. आर. रहमानची पत्नी सायरा बानोने घटस्फोटाची घोषणा केली. लग्नाच्या 29 वर्षानंतर दोघेही वेगळे होणार आहेत. सायरा बानोच्या म्हणण्यानुसार, या नात्यात बराच काळ राहिल्याने ती त्रस्त होती आणि परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली होती. अशा परिस्थितीत हे नाते सांभाळणे अधिक कठीण होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

एआर रहमानची नेट वर्थ

देश आणि जगात स्वत:चे नाव कमावणाऱ्या एआर रहमान यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पूर्वी तो एका गाण्यासाठी लाखो रुपये घेत असे, पण जसजशी त्याची लोकप्रियता वाढली आणि गायकाचा आवाज चाहत्यांना आवडू लागला, तसतशी तो करोडोंमध्ये फी आकारू लागला. आज त्यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत गायकांमध्ये केली जाते. अहवालांवर विश्वास ठेवला तर एआर रहमानची एकूण संपत्ती 280 दशलक्ष रुपये म्हणजेच 2 हजार 100 कोटी रुपये आहे.

एका गाण्यासाठी 8 ते 10 कोटी रुपये घेतो

एआर रहमान एका चित्रपटात गाण्यासाठी 8 ते 10 कोटी रुपये घेतात. लाइव्ह कॉन्सर्टसाठी तो तीन कोटी रुपये घेतो. गायकाच्या लक्झरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागडी वाहने आहेत. ज्यामध्ये 93 लाख रुपयांची व्होल्वो एसयूव्ही, 1.08 कोटी रुपयांची जग्वार आणि 2.86 कोटी रुपयांची मर्सिडीज आहे.

मुंबईसह परदेशात अलिशान घर

एआर रहमानचे मुंबईतच नव्हे तर परदेशातही आलिशान घर आहे. तथापि, त्याच्या एकूण कॅशबद्दल कोणतीही माहिती तूर्त उपलब्ध नाही. ए.आर. रहमान एक हिंदू होता. त्यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे. पण नंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो दिलीप कुमारपासून एआर रहमान बनला. या नावावर त्याने आपला ठसा उमटवला.

एआर रहमानचे लग्न अन घटस्फोटाच्या चर्चा

एआर रहमानने त्याची पत्नी सायरा बानोसोबत 1995 साली लग्न केले. गायकाने हे अरेंज मॅरेज केले होते आणि सायरा ही त्याच्या आईची पसंती होती. पण आता लग्नाच्या 29 वर्षानंतर दोघेही वेगळे होणार आहेत. या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गायकाकडून याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+