एआर रहमान आणि पत्नी सायराबाबत वकीलांचा मोठा खुलासा; म्हणाल्या ते अजूनही...
Rahman's Divorce- भारतातीलच नाही तर जगातील प्रसिद्ध संगितकार एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जगभरात एआर रहमान यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच झटका बसला. अशातच रहमान यांच्या वकील वंदना शाह यांनी नुकत्याच एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर पुन्हा एआर आणि त्याच्या पत्नीबाबत चर्चा सुरु झाल्या.

पत्नी सायराने केला होता खुलासा
एआर रहमान आणि पत्नी सायरा बानो यांनी यांच्यात कौटुंबिक तणाव होता. याबाबत पत्नी सायरा यांनी वादाची गोष्ट उघड केली. त्यानंतर २९ वर्षांच्या संसाराला दृष्ट लागली. याबाबत एकच चर्चा सुरु झाली. या दोघांनीही घटस्फोट घेतल्याची बातमी व्हायरल झाली. कौटुंबिक तणावामुळे या दोघांमध्येही वाद झाल्याचे बोलले गेले.
काय म्हणाल्या वकील वंदना शाह
रहमान यांच्या वकील वंदना शाह यांनी नुकतीच एआर रहमान आणि सायरा यांच्या विभक्त होण्यामागील कारणे आणि त्यांच्यातील वादांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, 'इतरांप्रमाणे प्रसिद्ध लोकांच्या घटस्फोटाची कारणेही सारखीच असतात. प्रायव्हसी हेच रहमान आणि सायरा बानू यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयामागील मुख्य कारण आहे. दोघांमध्ये काहीतरी घडलं असावं, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा.
अजूनही दोघे विभक्त झाले नाहीत
वंदना यांनी पुढे सांगितलं की, त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. मतभेद सोडवता न आल्याने या दोघांनीही फक्त एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या की, 'सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की, त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. ते अजूनही विवाहित आहेत. आम्ही एक जॉईंट स्टेटमेंट जारी केलं होतं की, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि ते सोडवू शकत नाहीयेत. त्यामुळे त्यांना हे लग्न मोडावं लागलं. आम्ही कुठेही नाही म्हटलं की, त्यांचा घटस्फोट झाला आहे, अजून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे'












Click it and Unblock the Notifications