रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीच्या निर्णयावर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट, व्हिडिओ केला शेअर
Anushka Sharma On Ravichandran Ashwin Retirement: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 18 डिसेंबर 2024 रोजी अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
अश्विनच्या या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. क्रिकेटरच्या चाहत्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण त्याच्यासाठी भावनिक पोस्ट करत आहेत. सोशल मीडियावर लोक अश्विनसाठी भावनिक नोट्सही लिहित आहेत.

अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने रविचंद्रन अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये क्रिकेटर आणि त्याची पत्नी पृथ्वी अश्विनला टॅग केलं आहे.
अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट ड्रेसिंग रूममधून रविचंद्रन अश्विनचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शेवटच्या वेळी आपल्या संघाला संबोधित करताना दिसत आहे. अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अश्विनने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सर्व खेळाडूंना भेटत आहे.
'माझ्या आत असलेला क्रिकेटचा फॅन सदैव जिवंत राहील'
क्रिकेटर रविचंद्रन अश्विनने काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंचीही भेट घेतल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर, तो त्याच्या मित्रांना संबोधित करतो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतो. माझ्यातील क्रिकेटचा फॅन कायम जिवंत राहील, असं अश्विनने म्हटलं आहे.
अनुष्का शर्माचे क्रिकेटशी नातं
अनुष्का शर्मा सध्या कामातून ब्रेक घेत आपल्या दोन मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे. मात्र, ती अनेकदा तिचा पती, भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे सामने पाहण्यासाठी येते. भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या पत्नींसोबत तिचे चांगले नाते आहे.












Click it and Unblock the Notifications