अनुष्का शर्मा म्हणाली- परफेक्ट पालक होण्याचा मोठा दबाव असतो, चूक मान्य केली तर त्रास नाही
Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली या वर्षी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीचा मुलगा अकायचा जन्म लंडनमध्ये झाला. मात्र, या जोडप्याने अद्याप आपल्या मुलाचा चेहरा माध्यमांसमोर उघड केलेला नाही.
लंडनमध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर काही महिन्यांनी अनुष्का शर्मा नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. आता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री पहिल्यांदाच पालकत्वावर मोकळेपणाने बोलली. परिपूर्ण पालक होण्यासाठी किती दडपण असते हे ही तिने मुलाखतीत सांगितले.

अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव
अनुष्का शर्मा म्हणाली, परफेक्ट पालक होण्याचा मोठा दबाव असतो. आपण परिपूर्ण नाही आणि त्यात काहीही चुकीचे नाही. आपण काही गोष्टींबद्दल तक्रार करू शकतो आणि आपल्या मुलांना या गोष्टी सांगण्यात काहीच गैर नाही. जेणेकरून त्यांनाही कळेल की त्यांचे पालकही चुका करतात. अनुष्का शर्माचे मत आहे की, पालकांवर वेगळ्या प्रकारचा दबाव असतो. मुलांसमोर स्वतःच्या चुका मान्य करण्यावर या अभिनेत्रीने भर दिला आणि सांगितले की, जर आपण आपल्या चुका मान्य केल्या तर त्यांच्यावरील दबाव कमी होईल. मुलांना अनेकदा त्यांच्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव जाणवतो.
आई झाल्यानंतर सामाजिक जीवन कमी
अनुष्का शर्माने पुढे बोलताना खुलासा केला की, आई झाल्यानंतर तिचे सामाजिक जीवन खूपच कमी झाले आहे. तिला आता फार कमी लोकांना भेटायला आवडते. अभिनेत्री म्हणाली, 'आता मी अशाच लोकांसोबत हँग आउट करते, पण असे लोक फार कमी आहेत.
आई झाल्यानंतर फिल्ममधून ब्रेक
अनुष्का शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो चित्रपटात दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. आई झाल्यानंतर अनुष्काने चित्रपटांमधून ब्रेक घेतला. 2021 मध्ये तिची मुलगी वामिकाचा जन्म झाला आणि आता ती 2 मुलांची आई आहे. अनुष्का लवकरच तिच्या 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर परत येऊ शकते.












Click it and Unblock the Notifications