'या' बाॅलीवूड सेलिब्रेटीच्या लेकीनं अवघ्या 7 महिन्यात केलं दुसऱ्यांदा लग्न! सोशल मीडियावर फोटो पोस्ट
Anurag Kashyap's daughter Alia Kashyap marries Shane Gregory : सात महिन्यात दोनवेळा लग्न कुणी केलं का.. हे कधी ऐकलं का जर ऐकलं नसेल, तर बाॅलीवूडच्या सेलिब्रेटीच्या मुलीनं सात महिन्यात दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. आता या विवाहाचे फोटोही सोशल मीडियावर आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अनुराग कश्यप यांच्या मुलगी आलिया कश्यप हिने शेन ग्रेगोईरीसोबत दुसऱ्यांदा लग्न केले आहे. या विवाह सोहळ्यात तिची छबी अनोख्या अंदाजात दिसली. तिने या विवाहाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

कोण आहे आलिया कश्यप?
आलिया कश्यप बाॅलीवूडचे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आहे.आलिया एक सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहे.रिपोर्टनुसार, आलियाने बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन शास्त्रात पदवी (एमबीए) चे शिक्षण घेतले आहे.
आलियाचे पहिले लग्न झाले होते थाटामाटात
आलियाने शेन ग्रेगोईरीशी डिसेंबर २०२४ मध्ये लग्न केले होते. तिने हे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार केले होते.या लग्नात ती खूपच आनंदी दिसली होती. मोठ्या थाटामाटात हे लग्न मुंबईत पार पडले. या लग्नाला बड्या अभिनेत्यांनी हजेरी लावली होती.
आलियाने दुसऱ्यांदा केले लग्न
यावेळी अलियाने दुसऱ्यांदा लग्न केले. एवढेच नाहीतर अवघ्या सातच महिन्यात हे लग्न त्याने केले होते. या लग्नातही ती खूपच खूश आणि आनंदी दिसत होती. तिने जेव्हा लग्नाचे फोटो तेव्हा हे गुपित उलगडले.
आपण विचार करत असाल की, एवढ्या कमी वेळेत सात महिन्यातच आलियाने दुसऱ्यांदा लग्न केले तर आम्ही सांगतो की, आलियाने दुसऱ्यांदा ज्याच्याशी लग्न केले तो पहिलाच पती आहे शेन ग्रेगोईरी... होय त्याच्याशीच डिसेंबरनंतर पुन्हा आलियाने हे लग्न केले आहे.
दुसऱ्यांदा लग्न कसे झाले..?
आलियाचे मुंबईत पती शेन ग्रेगोईरीसोबत हिंदु-परंरेनुसार लग्न झाले होते तर आता यावेळी पती शेन ग्रेगोईरीसोबत तिने ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. या लग्नातही ती खूपच खूश दिसत होती. या लग्नात तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला होता. तिने आपल्या विवाहाचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
कशी झाली आलिया आणि शेनची ओळख
आलियाने आपल्या जोडीदाराबद्दल सांगितले की, एका डेटींग APP द्वारे दोघे भेटले. ती आपल्या ब्रेकअपमुळे खूपच त्रस्त होती, त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये होती, शेन जेव्हा तिला डेटींग App वर भेटला तेव्हा दोघांत खूप गप्पा झाल्या त्यातून शेन आपल्यासाठी योग्य पती आहे असे तिला वाटले आणि नंतर दोघांनी लग्न केले.












Click it and Unblock the Notifications