Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video: कोण होत्या निर्मला कपूर? ज्यांच्या अंत्यदर्शनात अनन्या पांडे ढसाढसा रडली; सेलिब्रिटींची रिघ

ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे शुक्रवारी निधन झाले. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बातमी चित्रपटसृष्टीत पसरताच शोककळा पसरली. अनेक सेलिब्रिटींनी कपूर निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे, सुहाना खान आणि वेदांग रैना यांचा समावेश होता. अंत्यविधीच्या कार्यक्रमात अभिनेत्री अनन्या पांडे ढसाढसा रडताना दिसली.

Ananya Kapoor cried

अनन्याला रडू आवरेना

सध्या या दुःखद कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात पांढऱ्या एथनिक सूटमध्ये अनन्या पांडे तिच्या गाडीतून बाहेर पडताना उदास दिसत होती. काही वेळाने हलक्या निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातलेला वेदांग रैना येताना दिसला. अनन्याची संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरशी जवळची मैत्री आहे. वेदांग रैना हा बोनी कपूरची लहान मुलगी खुशी कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. एका व्हिडिओमध्ये निर्मल कपूर यांना अंतिम श्रद्धांजली वाहताना अनन्या खूप रडताना दिसत आहे.

श्रद्धांजलीला दिग्गज उपस्थित

संध्याकाळी राणी मुखर्जी, अनुपम खेर, जावेद अख्तर आणि चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांनीही कपूर यांच्या घरी जावून श्रद्धांजली वाहिली. जान्हवी कपूर देखील तिच्या आजीच्या निधनाने भावुक झाली. तिचा प्रियकर शिखर पहाडियासोबत ती दिसली. शनायाची जवळची मैत्रीण सुहाना खान देखील कपूर कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी धावली.

कोण होत्या निर्मला कपूर?

निर्मला कपूर या बोनी, अनिल आणि संजय कपूर यांच्या आई होत्या. त्यांचे शुक्रवारी निधन झाले . त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले, जिथे शोकाकुल अनिल कपूर यांच्यासोबत त्यांचा पुतण्या अर्जुन कपूर देखील रुग्णवाहिकेत होता. शनिवारी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+