अनंत-राधिकाच्या विवाह सोहळ्यात पाहुण्यासाठी ‘हा’ असणार खास मेन्यू
मुंबई: गेल्या मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाच्या लग्नाचा पहिला भव्य प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. अनंत अंबानींचं बालपण जामनगरमध्ये गेलं आहे. तसंच त्यांच्या आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्म देखील याठिकाणी झाला असल्याने अंबानी कुटुंबीयांनी प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरची निवड होती.
या सोहळ्याला देशासह- विदेशातल्या पाहूण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हा जंगी सोहळा अख्ख्या भारताने आणि जगाने पाहिला.. देशी-विदेशी पाहुण्यांसह, राजकारणी, क्रिकेटर्स, उद्योजक, बॉलिवूड, हॉलिवूडमधले कलाकारमंडळी अश्या सर्व क्षेत्रातील मंडळींना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं होतं.

तर, आता अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे. अनंत आणि राधिकाचं लग्न मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती आहे.
शुक्रवार १२ जुलै रोजी अनंत-राधिका हे दोघे सात फेरे घेतील. शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर रविवारी १४ जुलैला त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलेल आहे.
शाही लग्न सोहळ्याचे विदेशी पाहुण्यांना निमंत्रण
अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान-सलमान खान, बच्चन कुटुंब, विराट कोहली-अनुष्का शर्मा, विकी - कतरिनासह अनेक स्टार्सची मोठया स्टार्सना बोलवण्यात आलेलं आहे. याशिवाय देशातले राजकीय पुढाऱ्यांची देखील उपस्थिती असेल.
बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, लॅरी फिंक, स्टीफन श्वार्झमन, बॉब इगर, इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे देखील या विवाह सोहळ्यासाठी भारतात उपस्थित राहतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अनंत-राधिकाची संगीत सेरेमनी जल्लोषात
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी चालू आहे. त्यांच्या लग्नापूर्वीचे अनेक कार्यक्रम जल्लोषात पार पडत आहेत. मेहेंदी, त्यानंतर संगीत कार्यक्रमात बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी स्टेजवर डान्स केला.
त्यांच्या संगीत सेरेमनीतील डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यानंतर हळदीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांसह राजकिय पुढाऱ्यांची उपस्थिती होती.अनंत-राधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेण्यूच आयोजन करण्यात आलं आहे. त्यातील एक मेन्यूसाठी वाराणसी मधील प्रसिद्ध 'काशी चाट भंडार'च्या टीमला निमंत्रित करण्यात आल्याच कळतंय.
लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेन्यू
काही दिवसांपूर्वी स्वतः हा निता अंबानी यांनी या भंडार ला भेट देऊन त्यांनी हा मेन्यू ठरवला आहे.लग्नात आलेल्या पाहुण्यांना चाटमध्ये बनारसी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. पालक चाट, टोमॅटो चाट, चना कचोरी आणि टिक्की या पदार्थांचा आस्वाद अनंत-राधिकाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना घेता येणार आहे. अश्या प्रकारे अंबानी कुटुंब सध्या या शाही विवाह सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असल्याचं दिसत आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस











Click it and Unblock the Notifications