अनंत-राधिकाचे लग्न : जॉन सीना, नीता अंबानी, रजनीकांतचा पाहुण्यांसोबत केला डान्स!
मुंबई - आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ही मिरवणूक अंबानींच्या मुंबईतील निवासस्थान अँटिलिया येथून निघून जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचली.
लग्नातील पाहुण्यांनी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जोरदार डान्स केला. रेसलर जॉन सीना, रणवीर सिंग, संजय दत्त, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यासह अनंतची आई नीता अंबानी यांनीही मुलाच्या लग्नात डान्स केला.

काही वेळात लग्न समारंभ
रात्री 9.30 वाजता लग्न समारंभ असून सात फेऱ्यांचा विधी सुरू होईल. दरम्यान, लग्नसोहळ्यात हनी सिंगने परफॉर्मन्स केला. तसेच रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत डान्स करताना दिसली.विकी कौशल कतरिना कैफसोबत लग्नात पोहोचला असून रणबीर कपूर पत्नी आलिया भट्टसोबत सोहळ्यात पोहोचला
याशिवाय शाहरुख खान पत्नी गौरीसोबत लग्नाला उपस्थित आहे.
किम कार्दशियन तिच्या बहिणीसोबत मुंबईत लग्नसोहळ्याला आली. या लग्नात सहभागी होण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि निक जोनासह अनेक स्टारकास्ट मंडळी उपस्थित आहेत.
किम कार्दशियन भारतात येताच बॉलिवूड स्टार्सनाही आनंद झाला आहे. यादरम्यान किमचा लूकही खूप चर्चेत आहे. किम अतिशय सुंदर जंपसूट परिधान केला आहे. तिच्या डोळ्यांवरचा काळा चष्मा आणि साधी हेअरस्टाईलने ती आणखीनच सुंदर दिसत आहे.
देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास देखील भारतात आले आहेत. प्रियांका येताच तिने तिचा कपल फोटो तिच्या इन्स्टा हँडलवर शेअर केला. ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. प्रियंकासोबत तिची मुलगी मालतीही आली आहे.
लग्नाच्या काही वेळापूर्वी वधू राधिकाचे न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये राधिका अतिशय सुंदर लेहेंग्यात दिसत आहे. ती प्री-वेडिंग विधी करताना दिसत आहे.
लग्नाला जॉन सीना उपस्थित
स्थानिक पाहुण्यांसोबतच अनेक परदेशी पाहुणेही अनंत राधिकाच्या लग्नात सहभागी झाले आहेत. जॉन सीना या दोघांच्या लग्नाला हजेरी लावली आहे.
अनंत राधिकाच्या लग्नासाठी प्रसिद्ध गायिका 'रेमा' आली. या लग्नाला अनेक पाहुणे आले आहेत. या लग्नाला देशासोबतच अनेक परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. गायिका रेमा काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये रीमाचा लूक दिसत होता. ती लग्नाच झळकली.
लग्नासाठी यूपीमधून खास चाटची व्यवस्था करण्यात आली आहे. यूपीचे प्रसिद्ध चाट विक्रेते काशी चाट भंडार लग्नात आपले चाटचे दुकान लावणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच नीता अंबानी लग्नपत्रिका घेऊन काशीला गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी काशी चाट भंडारमधून चाट खाऊन लग्नासाठी ही चाट फायनल केली होती.
अनंत राधिकाच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली असून पाहुण्यांचे आगमन सुरूच आहे. अनंत राधिकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी किम कार्दशियन रात्री उशिरा भारतात आली होती, तिथे तिचे कुंकू लावून हार घालून भारतीय शैलीत स्वागत करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications