जया बच्चन यांच्या सांगण्यानुसार अमिताभ बच्चन करतील यांच्यात संपतीची वाटणी, कुणाला काय मिळणार? वाचा

Amitabh Bachchan : बाॅलीवूडचा शहेंशहा अमिताभ बच्चन यांच्या एका मुलाखतीची आता चर्चा होत आहे. या मुलाखतीत खुद्द आता अमिताभ बच्चन यांनी संपत्तीच्या वाटणीबद्दल खुलासा केला होता. बिग बीं आणि त्यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी मिळून संपत्तीच्या वाटणीचा निर्णय घेतला होता. त्यात कुणाला काय देणार हेही स्पष्ट केले होते, त्यावेळी पत्नीसोबत संपत्ती वाटणीसंदर्भात योजनाही केली होती.

आता संपत्तीच्या वाटणीच्या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडे किती संपत्ती आहे याचीही चर्चा होत आहे. सांगायचे झाल्यास 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती सुमारे 1,600 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

Amitabh Bachchan

कुणाला वाटा मिळणार..!

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या तेव्हाच्या योजनेनुसार, अभिषेक आणि श्वेता यांना संपत्तीत समान वाटा मिळणार आहे. अगेल्या काही काळात ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील घटस्फोटाच्या अफवा समोर आल्या पण त्या निव्वळ अफवा होत्या असे म्हटले जात आहे. आता या संपत्तीत अभिषेक बच्चन यांची मुलगी आणि पत्नीचाही समावेश असेल का यासंदर्भात बिग बी काय निर्णय घेतील हे काळच सांगेल.

काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?

अमिताभ बच्चन यांनी 2011 मध्ये एका मुलाखतीत कौटुंबिक संपत्ती वाटणीवर भाष्य केले होते. यात ते म्हणाले होते की, त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल. अमिताभ यांनी खुलासा केला की त्यांची मालमत्ता त्यांच्या दोन मुलांमध्ये - अभिषेक आणि श्वेता बच्चन नंदा यांच्यात समान प्रमाणात विभागली जाईल. पत्नी जया बच्चन यांच्यासोबत त्यांनी हा निर्णय घेतला.

मुला मुलीत भेद नाही...

अमिताभ म्हणाले होते की,, 'जेव्हा मी मरेन, तेव्हा माझ्याकडे जे काही असेल ते माझ्या मुली आणि मुलामध्ये समान वाटले जाईल. यामध्ये कोणताही भेदभाव नाही. जया आणि मी हे खूप आधी ठरवले होते. मुलगी ही दुसऱ्यांची मालमत्ता असते हे अनेकजण म्हणतात पण माझ्या दृष्टीने ती आमची मुलगी आहे. त्याला अभिषेकसारखेच अधिकार आहेत.

जलसा बंगला कुणाला दिला भेट?

माध्यमातील वृत्त आणि 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती अंदाजे सोळाशे कोटींच्या आसपास आहे. बच्चन यांनी त्यांचा 'जलसा' हा बंगला श्वेताला यापूर्वीच भेट दिला आहे, ज्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे.

श्वेता-नंदा, ऐश्वर्या रायकडे किती आहे संपत्ती

दरम्यान, श्वेता नंदाही संपत्तीच्या बाबतीत कमी नाही आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनची नेटवर्थ तर करोडोत आहे. तिच्याकडे 800 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे बोलले जाते. तिने चित्रपट, हाय-प्रोफाइल ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून भरपूर संपत्ती कमावली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+