अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा यांच्यावर फसवणुकीचा आरोप, गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Nikhil Nanda: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निखिल नंदा यांच्या विरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. निखिल नंदा हे एस्कॉर्ट्स कुबोटाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
ईटीव्ही भारतच्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील दातागंज पोलिसांनी निखिल नंदा आणि एका ट्रॅक्टर कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची आता चौकशी सुरू आहे.

रिपोर्टनुसार कंपनीचे उत्तर प्रदेश प्रमुख निखिल नंदा, प्रादेशिक व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाहजहांपूरचा एक डीलर आणि इतर तीन अधिकाऱ्यांवर या प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार त्याने ट्रॅक्टर एजन्सीच्या मालकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या दुःखद घटनेनंतरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराचा आरोप आहे की, निखिल नंदा आणि इतर कंपनीचे अधिकारी त्यांच्या भावावर सतत अधिक विक्री करण्यासाठी दबाव आणत होते. या दबावामुळे त्याच्या भावाची मानसिक स्थिती बिघडली. जर विक्रीचे लक्ष्य साध्य झाले नाही तर त्यांचा डीलरशिप परवाना रद्द केला जाईल, असा आरोप करण्यात आला आहे.
त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, 21 नोव्हेंबर 2024 रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा एक ग्रुप जितेंद्र यांना भेटण्यासाठी आला आणि त्यांनी पुन्हा विक्री वाढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. दुसऱ्याच दिवशी 22 नोव्हेंबर रोजी जितेंद्रने आत्महत्या केली. जितेंद्रच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, न्यायालयाने हस्तक्षेप करेपर्यंत पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नाही. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई सुरू करण्यात आली.
निखिल नंदा हे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जावई आहेत
निखिल नंदा हे राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचे चिरंजीव आहेत. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनचे पती आहे. त्यांना दोन मुले आहेत. नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा हे त्यांच्या मुलांची नावे आहेत. जे त्यांची आई श्वेतासोबत मुंबईत राहतात. निखिल त्यांना अधून-मधून भेटण्यासाठी मुंबईत येतात.












Click it and Unblock the Notifications