काय सांगताय! अमिताभ बच्चन यांची मुलगी 'लग्नाविना होणार आई', जुळे चिमुकले घरी येणार,नेमकं सत्य काय?
Bhavana Ramanna Pregnancy : 'फॅमिली' या बॉलिवूड चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भावना रमन्ना सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.
खरंतर, अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या बेबी बंपचा एक गोंडस फोटो शेअर केला. त्यानंतर मात्र, तिच्या चाहत्यांना धक्काच बसला.
कारण ती लग्नाविनाच आई होणार आहे. याबाबत तिने सविस्तर माहिती देखील दिली आहे. चला तर बीग बींच्या पडद्यावरील मुलीच्या गर्भधारणेविषयी सर्व काही जाणून घेऊया. तिचा हा प्रवास समजून घेऊया..!

भावना रमन्ना बनणार सिंगल मदर!
अभिनेत्री भावना रमन्नाचा हा फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. विशेष म्हणजे भावना लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार आहे आणि तेही लग्नाशिवाय. भावना रमन्ना यांनी अलीकडेच खुलासा केला की ती IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने आई होणार आहे.
भावना रमन्ना 6 महिन्यांची गर्भवती
भावना रमन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांसाठी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स इंस्टाग्रामवर शेअर करत राहते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सध्या 6 महिन्यांची गर्भवती आहे आणि ती या प्रवासाबद्दल खूप भावनिक झालेली आहे.
भावना रमण्णाने इंस्टाग्रामवर दाखवला बेबी बंप
अनारकली सूटमध्ये दिसणारी भावना रमण्णा हिने इंस्टाग्रामवर तिचा बेबी बंप दाखवणारा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे - मी कधीच विचार केला नव्हता की, असा दिवस येईल जेव्हा मी असे म्हणेन पण हो, मी गर्भवती आहे, तीही जुळ्या मुलांसह.
भावना रमण्णा पुढे लिहितेय की, जेव्हा मी 30 वर्षांची होते तेव्हा मी आई होण्याचा विचार केला नव्हता. पण मी 40 वर्षांची होताच आई होण्याची इच्छा निर्माण झाली.
हा निर्णय घेणे सोपे नव्हते, विशेषतः एका अविवाहित महिलेसाठी. आयव्हीएफ क्लिनिकने मला नाकारले, परंतु माझे वडील, भावंडे आणि मित्र नेहमीच मला पाठिंबा देत होते.
अनेक आयव्हीएफ सेंटरने नकार दिला
भावना रमण्णा हिने असेही सांगितले आहे की, जेव्हा तिने सिंगल पालक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक क्लिनिकने तिचा केस घेण्यास नकार दिला.
तरीही, तिने हार मानली नाही आणि तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने हा कठीण प्रवास पूर्ण केला. आता तिचे गरोदरपणाचे फोटो समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी तिचे मनापासून अभिनंदन करू लागले आहेत.












Click it and Unblock the Notifications