अमिताभ बच्चन यांना 'डॉन' बनवणाऱ्या दिग्गदर्शकांनी घेतला अखेरचा श्वास; या बिमारीने घेतला जीव!
Chandra Barot death news : 'डॉन' या क्लासिक कल्ट चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे रविवारी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पत्नी दीपा बारोट यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, "गेल्या सात वर्षांपासून ते फुफ्फुसांच्या फायब्रोसिसने ग्रस्त होते. तर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विशेष बाब म्हणजे, अमिताभ बच्चन यांना डॉन या चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण करून देणारे दिग्दर्शक म्हणून चंद्रा बारोट यांना ओळखले जाते.

गेल्या काही वर्षांपासून होते आजारी!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. त्यानंतर त्यांना गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर डॉ. मनीष शेट्टी उपचार करत होते.
यापूर्वी त्यांना जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डॉन' चित्रपटासाठी चंद्रा बारोट ओळखले जातात. या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना स्टारडमची नवी उंची दिली.
डॉन चित्रपट बनला त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड!
चंद्रा बारोट यांनी मनोज कुमार यांच्या जवळपास सर्व चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मनोज कुमार यांच्या सर्व चित्रपटांमध्ये चंद्रा बारोट यांच्यासोबत काम करणारे मनोज गोस्वामी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांनी मनोज कुमार यांच्यासोबत पूरब पश्चिम ते क्रांती या चित्रपटांपर्यंत काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी डॉनसाठी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम केलं.
मनोज कुमार यांनीच त्या चित्रपटात एक गाणं समाविष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर 'खैके पान बनारस वाला' हे गाणं या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं. मनोज कुमार यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करण्यासाठी ते मला नेहमी फोन करायचे. फक्त मित्राला मदत करण्यासाठी चंद्रा बारोट यांनी 'डॉन'चं दिग्दर्शन केलं होतं आणि हाच चित्रपट त्यांच्या करिअरमधील सर्वांत मोठा ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण, इफ्तेखार, ओम शिवपुरी, कमल कपूर यांच्या भूमिका होत्या.
फरहान अख्तरने शोक व्यक्त केला!
चंद्रा बारोट यांच्या निधनाच्या बातमीनंतर, डॉन फ्रँचायझी पुढे नेणारा दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'ओजी डॉन'चे दिग्दर्शक आता आपल्यात नाहीत हे जाणून दुःख झाले. चंद्रा बारोटजींच्या आत्म्याला शांती मिळो. कुटुंबियांना मनापासून संवेदना.












Click it and Unblock the Notifications