अमिषा पटेलने 49 व्या वर्षी तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान तरुणाशी केले असे कृत्य! ती प्रेमात तर नाही?
Amisha Patel : बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेल तिच्या बोल्ड शैलीसाठी खूप लोकप्रिय आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही लोक वेडे आहेत. कहो ना प्यार हैं ते गदर अन् गदर- 2 पर्यंत रसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या अमिषा पटेल या अभिनेत्रीच्या मनावर कुणीतरी गारुड केलं असंच म्हणावं लागेल.
अमिषा 49 वर्षांची असून पण तिने अजून लग्न केलेले नाही आणि ती जोडीदाराच्या शोधात आहे.अमिषा पटेलचे चाहते अभिनेत्रीच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्या दरम्यान अमिषा पटेल अचानक डेटिंगच्या निमित्ताने चर्चेत आली आहे.

'गदर 2' चित्रपटात सनी देओलच्या सकीनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमिषा पटेल अलीकडेच एका करोडपती उद्योगपतीसोबत मैत्री करताना दिसली.
अमिषाने शेअर केला फोटो
अमिषाने एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी अंदाज लावला की अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाचा प्रवेश झाला आहे.
निरवान बिर्लासोबत दिसली अमिषा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अमिषा पटेल करोडपती उद्योगपती निरवान बिर्लासोबत पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच छान दिसत आहे हे पाहून लोकांना प्रश्न पडला की, सोबतची व्यक्ती कोण आहे.
इंस्टाग्रामवर छायाचित्र शेअर करताना अमिषाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "दुबईत माझा प्रिय मित्र निरवान बिर्लासोबत अद्भुत संध्याकाळ." या कॅप्शनसोबत तिने अनेक रेड हार्ट्सही टाकले आहेत.
अमिषा पटेलचा फोटो व्हायरल
अमिषा पटेलचा फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर काही मिनिटांतच व्हायरल झाला. अशा परिस्थितीत अमिषा पटेल बिझनेसमन निरवान बिर्लाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. अमिषाच्या या फोटोवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.
फोटोमध्ये दिसणारा निर्वाण बिर्ला कोण?
अमिषा पटेल यांच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान असलेला निर्वान बिर्ला हा बिझनेस टायकून यशोवर्धन बिर्ला आणि अवंती बिर्ला यांचा मुलगा आहे तो एक व्यावसायिक आणि गायक असण्यासोबतच, निर्वाण बिर्ला ओपन माइंड्स आणि बिर्ला ब्रेनियाक्सचे संस्थापक देखील आहेत.












Click it and Unblock the Notifications