अमिषा पटेल सलमान खानशी लग्न करणार का? अमिषा स्पष्टचं बोलली
Mumbai: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल नुकतीच 'गदर 2' चित्रपटातून पडद्यावर परतली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. अलीकडेच तिने तिच्या एक्सवर आस्क मी एनीथिंग सत्र आयोजित केले. ज्यामध्ये चाहत्याने तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला.
अमिषा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच X (पूर्वीचे ट्विटर) वर आस्क मी एनीथिंग सत्र आयोजित केले होते. ज्यामध्ये एका चाहत्याने विचारले की ती लग्न कधी करणार? यावर मी मिस्टर राईटला शोधत होती पण तो सापडला नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री अमिषाने चाहत्यांना दिली.

आम्ही सिंगल आहोत म्हणून लग्न करायच?
दुस-या एका युजरने अमिषा पटेलला सलमान खानशी लग्न करण्याचा सल्ला दिला कारण दोघेही सध्या सिंगल आहेत. मात्र, चाहत्याच्या या सूचनेने अभिनेत्री भडकली आणि तिने उत्तरात म्हटले की, 'सलमानचे लग्न झालेले नाही, माझेही लग्न झालेले नाही, त्यामुळे आम्ही लग्न करायच का. याला काय तर्क आहे. हे लग्न आहे की चित्रपट प्रकल्प? असं संतप्त उत्तर अमिषाने चाहत्याला दिलं.
49 वर्षांची अमिषा पटेल अविवाहित जीवन जगत आहे. तिने 2002 मध्ये सलमान खानसोबत 'ये है जलवा' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली होती. मात्र, त्यानंतर दोघेही एकाही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. अभिनेत्रीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की सलमान अजूनही तिचा चांगला मित्र आहे आणि त्यांच्यात चांगले बॉन्डिंग आहे.
अमीषा पटेलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अमीषा पटेलने गदर: एक प्रेम कथा, आप मुझे अच्छे लगने लगे, मंगल पांडे: द रायझिंग, हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि थोडा प्यार थोडा मॅजिक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलीकडेच तिचा गदर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये अमीषाने सनी देओलसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले.
दुसरीकडे, सलमान खान शेवटचा टायगर 3 मध्ये कतरिना कैफसोबत दिसला होता. ज्याला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता तो त्याच्या आगामी चित्रपट सिकंदरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी ईदला सलमान खानचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मोठ्या गॅपनंतर सलमान खानचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सलमान खानच्या चाहत्यांना आगामी चित्रपटाची मोठी उत्सुकता लागलेली आहे.












Click it and Unblock the Notifications