फायरचा फ्लाँवर झाला..! 'पुष्पा'ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; मेडिकल टेस्टही केली
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज हैदराबाद पोलिसांनी अटक केली. संध्या थिएटरमध्ये आयोजित केलेल्या प्रिमिअर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकरणात आज अल्लू अर्जुनला अटक झाली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्याचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय होता अल्लू अर्जुनवर आरोप?
अल्लू अर्जुनचा पुष्पा-२ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या प्रिमिअर शो हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लाखोंची गर्दी जमली होती. याच गर्दीत चेंगराचेंगरी झाली. अखेर अल्लू अर्जूनच्या प्रायव्हेट बाँडीगार्डला धक्काबुक्की करावी लागली. पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप, करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जुनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली. तसेच दुःख व्यक्त करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun being brought out of Gandhi Hospital after his medical examination.
— ANI (@ANI) December 13, 2024
As per L Ramesh Kumar, ACP Chikkadpally, Allu Arjun has been arrested in connection with the case of the death of a woman at Sandhya theatre on December 4, during… pic.twitter.com/euOhYLeEUh
अल्लू अर्जुनला अटक व कोठडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आलं. दक्षिणेत प्रचंड फेमस असलेल्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी तिथेही गर्दी झाली होती. अल्लू अर्जुनला पाहून त्यावेळीही चाहत्यांनी आरडाओरड सुरू केली.एका सर्वसामान्य आरोपीप्रमाणे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. तसेच त्याला शासकीय रुग्णालयातही मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आलं. दरम्यान, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायलाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications