बॉक्स ऑफिसवर 'राज' करायला येतोय पुष्पा!, नवीन वर्षात अल्लू अर्जुनचे 'हे' ५ चित्रपट उडवणार धुराळा
Allu Arjun Upcoming Movies : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'आयकॉन स्टार' अल्लू अर्जुन सध्या यशाच्या शिखरावर आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला.
१८०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून इतिहास रचणारा हा सुपरस्टार आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर 'राडा' करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पुढील काही वर्षांत अल्लू अर्जुनचे असे काही चित्रपट येत आहेत, जे भारतीय सिनेमाचे गणित बदलू शकतात. पौराणिक कथांपासून ते हाय-व्होल्टेज अॅक्शनपर्यंत, जाणून घेऊया त्याच्या आगामी ५ बिग बजेट चित्रपटांबद्दल.

१. AA22X A6 : अॅटली आणि अल्लू अर्जुनची 'महा-युती'
बॉलिवूडमध्ये 'जवान' सारखा ब्लॉकबस्टर देणारा दिग्दर्शक अॅटली आणि अल्लू अर्जुन पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्बल ८०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात केवळ अल्लू अर्जुनच नाही, तर दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर आणि मृणाल ठाकूर यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे.
२. AA23 : लोकेश कनगराजचा अॅक्शन थ्रिलर
'कैथी' आणि 'विक्रम' फेम दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्यासोबत अल्लू अर्जुन काम करणार आहे. हा एक डार्क अॅक्शन थ्रिलर असणार आहे. लोकेश कनगराजच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा (LCU) हा भाग असेल की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अधिकृत घोषणा बाकी असली तरी, हा चित्रपट २०२८ पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
३. त्रिविक्रम श्रीनिवाससोबत पौराणिक महाकाव्य
अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांची जोडी 'अला वैकुंठपुरमलो' नंतर पुन्हा एकदा एकत्र येत आहे. पण यावेळी विषय कौटुंबिक नसून पौराणिक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या १००० कोटींच्या भव्य चित्रपटात अल्लू अर्जुन भगवान कार्तिकेय यांची भूमिका साकारू शकतो. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भव्य सेटच्या बाबतीत हा चित्रपट 'बाहुबली'ला टक्कर देणारा असेल असे म्हटले जाते.
४. संदीप रेड्डी वांगा आणि अल्लू अर्जुनचा 'क्रेझी' प्रोजेक्ट
'अर्जुन रेड्डी' आणि 'अॅनिमल' सारखे वादग्रस्त पण सुपरहिट चित्रपट देणारा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आता अल्लू अर्जुनला दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली आहे. संदीप रेड्डी वांगा सध्या त्यांचे इतर प्रकल्प (प्रभासचा 'स्पिरिट') पूर्ण करत आहेत. त्यानंतर या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होईल. हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात 'रॉ' आणि 'पॉवरफुल' चित्रपट ठरण्याची चिन्हे आहेत.
५. पुष्पा ३: द रॅम्पेज (Pushpa 3: The Rampage)
पुष्पा राजची दहशत इथेच संपत नाही! 'पुष्पा २' च्या यशानंतर निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन काम वेगाने सुरू आहे. तिसऱ्या भागात पुष्पा राजचे साम्राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे विस्तारते, हे पाहणे रंजक ठरेल. हा चित्रपट २०२८ मध्ये प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे. अल्लू अर्जुनने केवळ दाक्षिणात्य प्रेक्षकच नव्हे, तर जागतिक प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. आगामी पाचही चित्रपट हे १००० कोटींहून अधिक कमाई करण्याची क्षमता ठेवणारे आहेत.












Click it and Unblock the Notifications