मंडे टेस्टमध्येही पास झाली 'पुष्पा 2' फिल्म, अल्लूच्या चित्रपटाने घसरणीनंतरही केली चांगली कमाई
Pushpa 2 Box Office Collection Day 5: दक्षिण सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2' हा 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड बनवण्यास सुरूवात केली आहे. चित्रपटाची चर्चा आधीच झाली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन 5 दिवस झाले असून 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.
ट्रेड ट्रॅक साइट Sacknilk नुसार, पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 119.25 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 141.05 कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी 64.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारी, त्याच्या कमाईत 54.27% ची घट झाली. मात्र सोमवारी जितकी कमाई पुष्पा-२ ने केली आहे तितकी कमाई इतर कोणत्याही चित्रपटाने केलेली नाही.
साऊथ चित्रपटांच्या ट्रेडचा मागोवा घेणारी विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी सोमवारी 100 कोटी रुपयांच्या वरच्या कमाईची माहिती दिली. त्यांच्या मते या चित्रपटाने पहिल्या सोमवारी जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन
(भारत) तेलुगू - 211.7 कोटी
हिंदी - 331.7 कोटी
तमिळ - 34.45 कोटी
कन्नड - 4.05 कोटी
मल्याळम - 11.2 कोटी
एकूण - 593.1 कोटी
चित्रपटाची कमाई 2000 कोटींवर पोहोचेल
पुष्पा 2 लवकरच हजार कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल अशी आशा ट्रेड पंडीतांना आहे. निर्मात्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही चित्रपटाची तिकिटे वाढवली होती. वास्तविक, हे राज्य अल्लू अर्जुनचा बालेकिल्ला आहे. त्याचे येथे सर्वाधिक चाहते आहेत.
अशा निर्मात्यांनी तिकीट दर वाढवून अधिक पैसे आकर्षित करण्याची योजना आखली. त्याचं झालं असं की, सरकारने तिकिटांचे दर वाढवले आणि चित्रपटाची कमाईही वाढली. याशिवाय अल्लूचा चित्रपट परदेशातही चांगली कमाई करत आहे. जगभरात त्याचे कलेक्शन 2000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, अशी चर्चा सद्या चित्रपटसृष्टीत सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications