रणवीरचा सर्वांसमोर किस करत पत्नीच्या नाकाला लावला केक; कसा झाला अलियाचा वाढदिवस? वाचा
रणबीर कपूर व अलिया भट हे बाँलिवूडमधील सर्वात प्रतिभाशाली कपल म्हणून ओळखले जाते. आलिया भट येत्या १५ मार्चला आपला ३२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यापूर्वी तिने मिडिया व कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. रणबीर कपुर, आलिया व त्यांच्या पालकांनी आज १३ मार्चला हा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

वडिलांसोबत कापला केक
सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट १५ मार्च रोजी तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. मात्र त्यापूर्वीच आलियाने तिचा वाढदिवस मीडिया आणि पॅप्ससोबत साजरा केला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या पालकांसोबत केक कापून त्यांचा प्री-बर्थडे साजरा केला. ज्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. व्हिडिओमध्ये, आलिया भट्ट पेस्टल पीच रंगाच्या पोशाखात दिसत आहे. रणबीर कपूर पांढऱ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये दिसू शकतो. यावेळी, आलियाच्या वाढदिवसासाठी पांढऱ्या फुलांच्या थीम असलेल्या केकची खास व्यवस्था पॅप आणि मीडियाने केली होती. अभिनेत्रीने वडिलांसमोर केक कापला आणि तिचा वाढदिवस साजरा केला.
रणबीरचा किस आला चर्चेत
केक कापल्यानंतर रणबीर कपूरने त्याची पत्नी आलियाच्या कपाळावर किस घेतला. या किसची चांगलीच चर्चा रंगली. व्हिडिओमध्ये असे दिसून येते, की केक कापल्यानंतर, आलिया प्रथम स्वतः केक चावते आणि नंतर रणबीरलाही केक भरवते. यानंतर, रणबीर आलियाच्या नाकावर केक लावतो आणि नंतर तिला धरून कपाळावर चुंबन घेतो. यानंतर या जोडप्याने पापाराझींसोबत त्यांचे फोटोही काढले.
आलियाचा लवकरच चित्रपट
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आलियाच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. आलिया भट्ट १५ मार्च रोजी ३२ वर्षांची होईल. तिचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईत झाला होता. २०२२ मध्ये आलेल्या 'ब्रह्मास्त्र: भाग १ - शिवा' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत ती दिसली होती. ती संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.












Click it and Unblock the Notifications