Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अक्षय कुमारचा केसरी - 2 अडचणीत! सिनेमातील संवादासाठी कवितेच्या ओळी काॅपी केल्याचा लागला आरोप

Akshay Kumar's Kesari Part 2 Film Trouble : अक्षय कुमार याची केसरी पार्ट- 2 चित्रपट अडचणीत सापडला आहे. केसरी -2 मधील लेखकावर काॅपीराईटचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे आता चित्रपट रिलिज झाल्यानंतर विघ्न आले आहे.

अक्षय कुमारची बहुचर्चित फिल्म केसरीच्या जोरदार यशानंतर निर्मात्याने या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला आहे, प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट आता कमाईही सरासरीत करत आहे. चित्रपटाला रसिकांनी फारसे डोक्यावर घेतले नाही, आणि खूपच जास्त पसंत केले नाही. सध्या हा चित्रपट सरासरी चालत आहे. यादरम्यान या चित्रपटाच्या काही डाॅयलाॅग्जसंदर्भात वादंग माजले आहे.

Akshay Kumar s Kesari Part 2 Film Trouble

काय आहे काॅपीराईटचा आरोप?

आम्ही तुम्हाला सांगतो की, केसरी 2 मध्ये अक्षयकुमारसोबत आर. माधवन, अनन्या पांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अलीकडेच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, केसरी 2 चे लेखक सुमीत सक्सेना यांच्यावर काॅपीराईटचा आरोप लावण्यात आला आहे. कवी आणि गीतकार याह्या बूटवाला यांनी दावा केला की, या चित्रपटात
अनन्या पांडे हिने आपल्या भुमिकेत दिलरीत गिलद्वारे यांचे जे डायलाॅग्ज आहेत ते आपल्या युट्यूबवर अुलोड केलेल्या जालियनवाला बागमधून काॅपी केलेले आहेत. यासंदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

याह्या बुटवाला यांनी म्हटले की, "मला केसरी 2 चित्रपटातील एका संवादाची क्लिप 4 दिवसांपूर्वी प्राप्त झाली, जी त्यांनी माझ्या जालियनवाला बाग या कवितेतून कॉपी केली. ही कविता मी 5 वर्षांपूर्वी @unerasepoetry YouTube चॅनेलवर अपलोड केली होती. येथे दोन क्लिप आहेत आणि त्या पुर्णतः काॅपी करण्यात आलेल्या आहेत." याह्या बूट वाला यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करत आपल्या जुन्या व्हिडिओची झलक दाखवली होती पण त्यांनी नंतर हा व्हिडिओ डिलीट केला होता, असे त्यांचे म्हणणे आहे.

काय आहे याह्या बुटवाला यांची पोस्ट?

याह्या बुटवाला यांनी म्हटले की, Kesari - 2 मध्ये माझ्या कवितेच्या ओळी वापरलेली रिल्स माझ्या इन्स्टाग्रामवरुन हटवण्यात आली आहे, ती रील मी काढलेली नाही. तरीसुद्धा, जोपर्यंत या प्रकरणाचे निराकरण होत नाही तोपर्यंत मी या समस्येबद्दल बोलत राहीन आणि तुम्हांला अपडेट देत राहील, कारण तुम्ही सर्वांनी मला मदत आणि समर्थन केले आहे. माझ्याकडे तुमच्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता याशिवाय काहीही नाही आणि आशा आहे की हे लवकरच याचे निराकरण होईल. तुम्ही सुद्धा एकत्र राहा आणि जमेल तितके ही गोष्ट पुढे न्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+