अक्षय कुमारचा मुलगा आरव रिलेशनशिपमध्ये? 'त्या' व्हिडीओने वाढल्या चर्चा; आरवसोबत दिसलेली सुंदरी कोण?
स्टार किड असूनही अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार अगदी साधा राहतो. त्यामुळे कायम चर्चा होते. आता आरव कुमारची एका वेगळ्या कारणामुळे चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीच्या ईद पार्टीत आरव कुमार एका सुंदर मुलीसोबत दिसला. विशेष म्हणजे त्याने इतर स्टार किड्सप्रमाणे तोंड लपवले नाही तर, फोटोसाठी पत्रकारांना पोजही दिली. आरव या मुलीसोबत अगदी बिनधास्त दिसत असल्याने त्याच्या चर्चा वाढल्या.

कोण होती ती सुंदरी?
आरव हुमा कुरैशीच्या ईद पार्टीत आला त्यावेळी त्याच्यासोबत एक लाल रंगाचा ड्रेस घातलेली सुंदर मुलगीही होती. ही मुलगी कोण, अशा चर्चा सुरु झाल्या. आरव आणि या मुलीचे फोटो तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रत्येकजण या मुलीचीच चर्चा करु लागला. विशेष म्हणजे या दोघांनीही फोटोग्राफरला अगदी सहज पोज दिल्याने आरव एवढा बिनधास्त कसा, या चर्चा रंगल्या.
फोटोखाली चाहत्यांच्या कमेंट
आरवसोबत उपस्थित असलेली ही सुंदर मुलगी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक दिसले. काही नेटकऱ्यांनी आरवसोबत त्याची चुलत बहीण सिमर भाटिया होती असे म्हटले. यावर चाहत्यांनी खूप कमेंट करायला सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले, "त्याला गर्लफ्रेंड मिळाल्याने तो आनंदी आहे. दुसऱ्याने लिहिले, मुलीला तिचा आनंदी जोडीदारही सापडला आहे." तिसऱ्याने लिहिले, "ती त्याची चुलत बहीण आहे." आरवचा व्हिडीओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओमधील मुलगी आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया हिच्यासारखीच दिसत असल्याने चर्चा वाढल्या.
आरवची फॅशनमध्ये आवड
बॉलिवूडमधील सर्वात मोठा अॅक्शन स्टार अक्षय कुमारचा मुलगा असूनही, आरव मनोरंजन उद्योगापासून दूर आहे. सार्वजनिक ठिकाणीही तो क्वचितच दिसतो. एका जुन्या मुलाखतीत, अक्षय कुमारने अभिमानाने सांगितले होते की आरवला चित्रपटांपेक्षा फॅशन डिझायनिंगमध्ये जास्त रस आहे. अक्षय कुमार म्हणाला होता की, "ट्विंकल आणि मी आरवला ज्या पद्धतीने वाढवले आहे त्यावर मी आनंदी आहे. तो खूप साधा मुलगा आहे. आम्ही त्याला कधीही काहीही करण्यास भाग पाडले नाही. त्याला फॅशनमध्ये रस आहे. तो सिनेमाचा भाग होऊ इच्छित नाही."












Click it and Unblock the Notifications