'केसरी-२' मधील 'फ**के यू' शब्द..! अक्षय म्हणाला, हो मी तो शब्द वापरलाय, कारण... उत्तराने चर्चा वाढली

अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर. माधवन यांच्या बहुप्रतिक्षित 'केसरी-२' चे ट्रेलर नुकतेच लाँन्च झाले. हा चित्रपट जालियनवाला बाग हत्यांकांडावर आधारीत आहे. या टिझरमध्ये अक्षय कुमारने अनसेन्साॅर केलेल्या 'एफ' शब्दामुळे हा टिझर प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. गुरुवारी या ट्रेलरच्या प्रदर्शनादरम्यान अक्षयने या अनसेन्साॅर शब्दांबाबत आपली भूमिका व्यक्त केली. त्याने व्यक्त केलेल्या या भुमिकेबाबतची आता चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

Akshay s opinion on Kesari-2 teaser

'एफ' शब्दाबद्दल काय म्हणाला?

ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात एका पत्रकाराने अक्षयला या ट्रेलमध्ये वापरलेल्या 'फ**के यू' या शब्दाबाबत विचारले. त्यावर अक्षयने या पत्रकारालाच प्रतिप्रश्न केला. अक्षय म्हणाला की, या ट्रेलमध्ये तू अजूनही गुलाम आहेस, असंही एक वाक्य होतं. त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? गुलाम या शब्दापेक्षा मोठी शिवी दुसरी कोणतीच असू शकत नाही. तुम्ही मला गुलाम या शब्दाबाबत विचारले असते तर आनंद झाला असता. पण तुम्ही 'फ**के यू' बद्दल विचारले.

अक्षयच्या जोडल्यात भावना

या कार्यक्रमात अक्षयने या चित्रपटाशी कशा वैयक्तीक भावना जोडल्या गेल्या आहेत, त्याबद्दल सांगितले. तो म्हणाला, माझ्या वडिलांचा जन्म जालियनवाला बाग हत्याकांड जेथे घडले त्याच्या अगदी समोर असणाऱ्या आलू कटरा गल्लीत झाला. मी अमृतसरमध्ये नाही तर, दिल्लीत जन्मलो. परंतु माझ्या वडिलांचा जन्म तेथे झाला. माझ्या आजोबांनी हे हत्याकांड घडलेले पाहिलेय. त्यांच्या आजूबाजूला त्यावेळी काय घडले हे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना व माझ्या वडिलांनी मला सांगितले होते. त्यामुळे मी हा चित्रपट रागाने बनवलाय असं अक्षयने सांगितलं.

कधी प्रदर्शित होणार?

'केसरी २' चित्रपटात अक्षय कुमार हा सी शंकरनारायणच्या भूमिकेत दिसणार आहे . 'केसरी २' हा चित्रपट १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. अक्षय कुमारसोबत आर माधवन आणि अनन्या पांडे हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 'केसरी २' चे दिग्दर्शन करण सिंह त्यागी यांनी केले आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटापूर्वी अक्षय कुमार स्काय फोर्समध्ये दिसला होता. या चित्रपटाव्यतिरिक्त त्याचे इतरही अनेक चित्रपट आहेत. 'केसरी २' व्यतिरिक्त तो 'हाऊसफुल ५', 'भूत बांगला', 'वेलकम ३' आणि 'जॉली एलएलबी ३' मध्येही दिसणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+