ऐश्वर्य ठाकरे कोण आहे? ज्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच धुमाकूळ घातलाय
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट 'निशांची' सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये लीड अभिनेता म्हणून पदार्पण करत आहेत. त्यामुळे आता सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय की ऐश्वर्य ठाकरे नक्की कोण आहेत? आणि त्यांना अनुराग कश्यप यांच्या चित्रपटात संधी कशी मिळाली?
ऐश्वर्य ठाकरे कोण आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्य ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकीय घराण्यातून आलेले आहेत. ते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांची आई स्मिता ठाकरे या बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहेत.
ऐश्वर्य यांनी त्यांचे शालेय शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथून पूर्ण केले आहे. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे आणि ते स्वतःच्या फिटनेसबाबत नेहमी जागरूक असतात.
सहायक दिग्दर्शक म्हणून केलं आहे काम
मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी ऐश्वर्य ठाकरे यांनी पाच वर्षे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच, ते ग्लॅमरच्या या दुनियेत कॅमेऱ्याच्या मागेही काम करून गेले आहेत.
ते 2015 मध्ये संजय लीला भन्साळी यांचा सुपरहिट चित्रपट 'बाजीराव मस्तानी' यामध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते.
सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीत
ऐश्वर्य ठाकरे सोशल मीडियावर फारसे अॅक्टिव्ह नसले तरीही, त्यांच्या इंस्टाग्रामवर फक्त ५ पोस्ट्स असूनही त्यांचे ११,००० फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतची उत्सुकता लोकांमध्ये वाढली आहे.
अलाया फर्निचरवाला सोबत अफेअरची चर्चा
साल 2021 मध्ये ऐश्वर्य ठाकरेचे नाव अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला सोबत romantic रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अलाया हिने या गोष्टी अफवा असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तिच्या म्हणण्यानुसार, ती आणि ऐश्वर्य फक्त चांगले मित्र आहेत.
तसेच ऐश्वर्य हे अभिनेता अहान पांडे यांचेही घनिष्ठ मित्र आहेत. दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसले आहेत.
19 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार 'निशांची'
ऐश्वर्य ठाकरे यांच्या पहिल्याच चित्रपटाचा 'निशांची' अॅनिमेटेड मोशन पोस्टर प्रदर्शित करताना निर्मात्यांनी या चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट 19 सप्टेंबर 2025 अशी जाहीर केली आहे.
या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे सोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद झिशान अय्यूब, आणि कुमुद मिश्रा यांच्यासारखे दमदार कलाकारही झळकणार आहेत.












Click it and Unblock the Notifications