Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायची खास पोस्ट, शेअर केला खास फोटो

Abhishek Bachchan Birthday: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवा मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. या अफवांना ऐश्वर्याने पुन्हा एकदा पूर्णविराम दिला आहे. अभिनेता अभिषेकने 5 फेब्रुवारी रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी त्याची पत्नी ऐश्वर्याने अभिषेकच्या बालपणीचा फोटो शेअर करून एक खास पोस्ट शेअर केली आहे.

abhishek bachchan and aishwarya rai

अभिषेक बच्चनच्या वाढदिवशी ऐश्वर्या रायने तिच्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अभिषेकचा एक बालपणीचा फोटो शेयर केला आहे. तो ट्रायसायकलवर बसून कॅमेऱ्याकडे पाहत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्या लिहिते, "तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आनंद, चांगले आरोग्य, प्रेम आणि देवाचा आशीर्वाद सदैव मिळत राहो",अशी पोस्ट केली आहे.

ऐश्वर्या रायच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून सतत प्रतिक्रिया येत आहेत. घटस्फोटाच्या अफवांचे खंडन करण्यासाठी चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे की 'या जोडप्याच्या नात्यात कोणतीही समस्या नाही'.एका चाहत्याने लिहिले, "बघा, घटस्फोटाबद्दल बोलत असणारे लोक आता कुठे आहेत?"

जुलै 2024 मध्ये अनंत अंबानीच्या लग्नादरम्यान ऐश्वर्या आणि तिच्या कुटुंबात मतभेद असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या बच्चन या सोहळ्यात स्वतंत्रपणे आल्यापासून सुरुवात झाली. तर बच्चन कुटुंबातील इतर सदस्य अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली लग्नसोहळ्याला एकत्र आले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+