मुंबईतील या स्कूलची फीस ऐकूण तुम्हाला बसेल धक्का, बॉलिवूड सेलिब्रिटींची पोरं इथं शिकतात

Aaradhya Bachchan School Fees: ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. आई आणि मुलीचं हे बॉन्डिंग अनेकदा सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळतं. ऐश्वर्या अनेकदा आराध्याला अवॉर्ड शो आणि फॅशन वॉक अशा अनेक कार्यक्रमांना सोबत घेऊन जाते.

ऐश्वर्याची मुलगी आराध्याच्या शालेय शिक्षणाविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल या प्रतिष्ठित संस्थेत आराध्या शिक्षण घेत आहे.सन 2003 मध्ये नीता अंबानी यांनी स्थापन केलेली स्कूल तिच्या उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

Aradhya Bachchan

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फीस

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी प्रत्येक वर्गानुसार बदलते. मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्कूलमधील एलकेजी ते इयत्ता 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वार्षिक फी सुमारे 1.70 लाख रुपये आहे. इयत्ता 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांचे वार्षिक फी 4.48 लाख रुपये आहे, तर इयत्ता 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांना वार्षिक 9.65 लाख रुपये भरावे लागतात.

ही संस्था मुंबईतील सर्वात महागड्या स्कूलपैकी एक आहे. या स्कूलचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. या स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये सारा अली खान,अनन्या पांडे, सुहाना खान आणि कियारा अडवाणी या कलाकारांचा समावेश आहे. अद्वैत नायर आणि रणवीर अलाहाबादियासारख्या उद्योजकांनीही याच स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींची पोरं इथं शिकतात

या स्कूलमध्ये आराध्या बच्चनसह अनेक सेलिब्रिटी मुलेही याच स्कूलमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. शाहरुख खानचा मुलगा अबराम, करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान आणि करण जोहरची जुळी मुले यश आणि रुही हे देखील याच स्कूलचे विद्यार्थी आहेत. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हे उत्कृष्ट शिक्षण आणि विविध क्षेत्रांतील प्रतिभेचे संगोपन करण्याच्या प्रतिष्ठेमुळे अनेकांची पहिली पसंती याच स्कूलला राहिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+