आराध्याला एअरपोर्टवर मारला धक्का..? अभिषेक-ऐश्वर्यासमोर नेमकं काय घडलं..? पहा Video
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राँय आपली मुलगी आराध्यासोबत आज भल्या पहाटे मुंबई विमानतळावर पोहोचले. न्यू ईयर सेलिब्रेशन करुन ते परतले असावेत, असा अंदाज काहींनी बांधला. मात्र एअरपोर्टवर आराध्या राँयला कुणीतरी धक्का दिल्याने ऐश्वर्या राँय अचानक टेन्शनमध्ये आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता आराध्याला खरंच कुणी धक्का दिलाय का..? दिला असेल तर कुणी..? हे प्रश्न सध्या नेटकऱ्यांकडून विचारले जात आहेत.

काय घडला नेमका प्रकार..?
आज पहाटे मुंबई विमानतळावर अभिषक, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन दिसले. ते बाहेरुन कदाचित न्यू ईयर साजरा करुन परतले असावेत, असा अंदाज आहे. या तिघांपैकी अभिषेक बच्चन हा पुढे होता व त्याच्या मागे ऐश्वर्या व आराध्या या चालत होत्या. आराध्याचा हात ऐश्वर्याच्या हातात होता. एके ठिकाणी अचानक आराध्या बच्चन उडी मारते. ते पाहून ऐश्वर्या राँय तिला कुणी धक्का दिलाय का..? असं विचारते. मात्र आराध्या फक्त हसत पुढे जाते. मात्र या प्रकारामुळे ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर आढ्या पडतात.
अभिषेकही होता सोबत
सध्या आराध्याच्या उडीचा आणि ऐश्वर्याच्या टेन्शनच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच फिरु लागला आहे. आराध्याला खरंच कुणी धक्का मारलाय का हे या व्हिडीओमधून समोर आलेलं नाहीये. मात्र आराध्या ज्या पद्धतीने हसत होती त्यावरून तरी तिला कोणी धक्का मारला नसेल, असं वाटत आहे. तिने फक्त उडी मारली असावी, असं वाटतं. मात्र अजूनही नेमकं काय घडलं हे समोर आलेलं नाहीये. मात्र त्यानंतर या दोघी थेट अभिषेक जवळ जात गाडीत बसतात, असं या व्हिडीओत दिसत आहे.


Click it and Unblock the Notifications
