अभिषेकला सोडून सलमान-ऐश्वर्या झाली जवळीक, एक्स बॉयफ्रेंडसोबत पोज, जाणून घ्या काय आहे सत्य
Aishwarya Rai Salman Khan: भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे राधिका मर्चंटसोबत १२ जुलै रोजी लग्न झाले. ज्यामध्ये देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता. पण दरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खानचा सोबतचा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

अंबानी कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत उपस्थित होती. हे पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावला की, ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबापासून कायमची दूर झाली आहे.
मधल्या काळात अश्या ही बातम्या समोर आल्या की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय लवकरच घटस्फोट घेऊ शकतात . मात्र, काही वेळानंतर दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसत होते. हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा जो फोटो व्हारल झाला आहे, त्यात काही तथ्य नाही. हा फोटो खरा नसून AI ने जनरेट केलेला फोटो आहे. सलमान खानसोबत उभी असलेली ऐश्वर्या राय फोटोत नाही. हा फोटो पूर्णपणे बनावट आहे. दोन वेगवेगळे फोटो एकत्र करून हा फोटो तयार करण्यात आला आहे. वास्तविक फोटोत सलमान खानसोबत त्याची बहीण अर्पिता खान आहे.












Click it and Unblock the Notifications