अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट होणार नाही? हा मोठा पुरावा चाहत्यांना मिळाला
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumours: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. दरम्यान या दोघांचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहून चाहत्यांसाठी आनंद बातमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत सुट्टीसाठी परदेशात गेली होती. त्यावेळी अभिषेक तिच्यासोबत दिसला नाही. पण आता समोर आलेले फोटो घटस्फोटाच्या बातम्यांचे खंडन करतात.

दरम्यान रॉयल ब्लॅक लेमन कंपनीच्या सीईओ यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अभिषेक आणि ऐश्वर्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये हे कपल त्यांची मुलगी आराध्यासोबत सुट्टी साजरी करताना दिसत आहे. आता घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान चाहत्यांना या जोडप्याला एकत्र पाहणे आवडेल.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय वेग-वेगळे पोहोचले होते. जिथे अभिषेक त्याच्या कुटुंबासोबत दिसला. तर ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत एकटीच पोहोचली होती. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकचा एकत्र फोटो व्हायरल झाला. ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात काहीतरी बिनसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
मात्र ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी बातमी आली होती की ऐश्वर्याने सासरचे घर जलसा सोडले आहे आणि ती तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाली आहे. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबामध्ये काही मतभेद आहेत. मात्र आता हा फोटो समोर आल्यानंतर ही अटकळ चुकीची ठरत आहे.












Click it and Unblock the Notifications