Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : घटस्फोटाच्या चर्चा सोडा आता ! भावाच्या लग्नात ऐश्वर्या-अभिषेक कजरा रे गाण्यावर जबदस्त डान्स

Aishwarya Rai Abhishek Bachchan Video: बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडीपैकी एक असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची आहे . अलिकडेच पुण्यात ऐश्वर्याच्या चुलत भावाच्या लग्नाला ही जोडी उपस्थित राहिले होती. त्यावेळी या जोडप्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंगळवार 1 एप्रिल रोजी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या-अभिषेक जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्याने एकत्र डान्स केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नाच्या समारंभात स्टेजवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत, ज्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

aishwarya rai abhishek bachchan dance video

या क्लिपमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक 'बंटी और बबली' या चित्रपटातील त्यांच्या प्रसिद्ध गाणं 'कजरा रे'वर नाचताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आराध्या बच्चनही होती. या क्लिपमध्ये पाहुणे जोडप्याला स्टेजवर घेऊन जात दिसत आहे. या गाण्यावर त्यांच्या नातेवाईकांसह 'कजरा रे' गाण्याचे हुक स्टेप्स सादर करताना दिसत आहेत.

मागील एक वर्षापासून ही जोडी घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान या दोघांनाही नेहमीच एकत्र येऊन या अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले आहे.. दरम्यान या जोडप्याने वेळोवेळी सिद्ध केले आहे की त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. पुन्हा एकदा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दोघांनाही इतक्या मजेदार पद्धतीने डान्स करताना पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत.

ऐश्वर्याने अभिषेकचा फोटो शेअर केला

फेब्रुवारी 2025 मध्ये अभिषेक बच्चनच्या 49 व्या वाढदिवशी ऐश्वर्याने त्याचा बालपणीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. "तुम्हाला आनंद, आरोग्य, प्रेम आणि प्रकाशाने भरलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो," असे ऐश्वर्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

या जोडीच्या आगामी प्रोजेक्ट बोलायचं झालं तर ऐश्वर्या राय बच्चनने कोणत्याही नवीन प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. दरम्यान, अभिषेक बच्चन अलीकडेच 'बी हॅपी' मध्ये दिसला. जर रिपोर्टवर विश्वास ठेवला तर त्याने शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात अभिषेक खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. तसेच निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+